---Advertisement---

VIDEO: केकेआरच्या पदार्पणवीरासाठी शमी ठरला कर्दनकाळ, रॉकेट थ्रोने केले दुर्दैवीरित्या धावबाद

On: शनिवार, ऑक्टोबर 2, 2021 10:13 AM
---Advertisement---

आयपीएल २०२१ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी (१ ऑक्टोबर) ४५ वा सामना पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून टीम सिफर्ट याला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. मात्र पंजाब किंग्जच्या मोहम्मद शमीने अचूक थ्रो करत त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याच्या या दुर्देवी विकेटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गोलंदाजी करताना फॉलो थ्रूमध्ये झेल टिपणे किंवा फलंदाजाला बाद करणे सोपी गोष्ट नसते. फिरकी गोलंदाज ही गोष्टी सहजरित्या करू शकतात. कारण त्यांच्याकडे पुरेसा वेळ शिल्लक असतो. परंतु वेगवान गोलंदाजांसाठी हे मुळीच सोपे नसते. कारण वेगवान गोलंदाजांना चेंडू टाकल्यानंतर आपला तोल देखील सांभाळावा लागतो. तरीही मोहम्मद शमीने फॉलो थ्रूमध्ये फलंदाजाला धावबाद केल्याने त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

तर झाले असे की, पंजाब किंग्स संघाची गोलंदाजी सुरू असताना १९ वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद शमी गोलंदाजीला आला होता. त्याने या षटकातील चौथ्या चेंडूवर फुल लेंथ चेंडू टाकला, ज्यावर फलंदाज सिफर्टने रिव्हर्स स्विप मारण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न फसला आणि चेंडू बॅटला लागला व खेळपट्टीवर थांबला. तितक्यात दिनेश कार्तिक आणि सिफर्टने एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. परंतु चपळ मोहम्मद शमीने धावत जाऊन चेंडू पकडला आणि नॉन स्ट्राइकच्या दिशेने डायरेक्ट थ्रो केला. त्याने फेकलेला चेंडूही बरोबर यष्टीला जाऊन धडकला आणि सिफर्टला फक्त २ धावांवर पॅव्हेलियनची वाट धरावी लागली.

https://twitter.com/Cricsphere/status/1443968410581286916?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1443968410581286916%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fwatch-video-mohammed-shami-send-off-tim-seifert-on-a-rocket-throw-84853

या सामन्यात पंजाब किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली. तर राहुल त्रिपाठीने ३४ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाला २० षटक अखेर ७ बाद १६५ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्स संघाकडून केएल राहूलने सर्वाधिक ६७ तर मयंक अगरवालने ४० धावांची खेळी करत हा सामना पंजाब किंग्स संघाला ५ गडी राखून जिंकून दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

फक्त कसोटी नव्हे वनडेतही स्म्रीतीचे ऑस्ट्रेलियन भूमीत शतक, हा अद्वितीय विक्रम करणारी पहिलीच भारतीय

घासून नाही ठासून येणार! आयपीएल २०२०मधील नामुष्कीनंतर धोनीच्या ‘त्या’ संदेशामुळे सीएसकेचे ढासू कमबॅक

रोना मना हैं! भावुक झालेल्या पदार्पणवीरासोबत नारायणची गमतीशीर कृती, कर्णधारालाही फुटलं हसू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---