---Advertisement---

चेन्नई वि. पंजाब सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

On: गुरूवार, ऑक्टोबर 7, 2021 2:29 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या ५३ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडणार आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाबद्दल बोलायचं झालं तर, या संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. हा संघ १८ गुणांसह आयपीएल स्पर्धेच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. या संघाने आतापर्यंत एकूण १३ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना ९ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर ४ सामन्यात या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

तसेच पंजाब किंग्स संघाच्या प्लेऑफच्या आशा अजूनही जिवंत आहेत. पंजाब किंग्स संघाने आतापर्यंत एकूण १३ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना ५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तसेच ८ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा संघ १० गुणांसह सहाव्या स्थानी आहे. तत्पूर्वी आम्ही तुमच्यासाठी या सामन्यासाठीचा सर्वोत्कृष्ट ११ खेळाडूंचा अंदाज घेऊन आलो आहोत. चला तर पाहूया, चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्यासाठीचा ड्रीम ११ संघ कसा असेल?

या सामन्याबद्दल अधिक माहिती
सामना – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स, ५३ वा सामना
दिनांक – ७ ऑक्टोबर २०२१, दुपारी ३:३० वाजता
ठिकाण – दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम,दुबई
हेड टू हेड – २४ सामने, चेन्नई सुपर किंग्स- १५ सामने, पंजाब किंग्स- ९ सामने.

या सामन्यासाठी असा असेल चेन्नई सुपर किंग्सचा संभावित ११ खेळाडूंचा संघ 
एमएस धोनी (कर्णधार, यष्टिरक्षक),फाफ डू प्लेसिस,ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, ड्वेन ब्रावो,रवींद्र जडेजा, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, जोश हेजलवुड.

या सामन्यासाठी असा असेल पंजाब किंग्सचा संभावित ११ खेळाडूंचा संघ 
केएल राहुल (कर्णधार,यष्टिरक्षक), मयंक अगरवाल, एडेन मार्करम,निकोलस पुरण, सरफराज खान, शाहरुख खान, मोईसिस हेनरिक्स, नाथन एलिस, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग.

या सामन्यात हे ११ खेळाडू असू शकतात ड्रीम ११ संघात 
यष्टिरक्षक – केएल राहुल
फलंदाज – ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा,मयंक अगरवाल, फाफ डू प्लेसिस
अष्टपैलू खेळाडू – रवींद्र जडेजा, मोईसिस हेनरिक्स,
गोलंदाज – मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग,नाथन एलिस,शार्दुल ठाकूर
कर्णधार – केएल राहुल
उपकर्णधार – ऋतुराज गायकवाड

महत्त्वाच्या बातम्या-

उमरानच्या वेगापुढे आरसीबीची उडाली भंबेरी, इंप्रेस झालेल्या विराटकडून मिळाली आयुष्यभर जपावी ‘अशी’ भेट

सागरिका घाटगेबरोबर लग्न होण्यापूर्वी ‘या’ अभिनेत्रीसोबत झहीर खानचे तब्बल ७ वर्षे होते प्रेमसंबंध

कौतुकाची थाप तर हवीच! विलियम्सनने बेंगलोरविरुद्धच्या ‘रॉयल’ विजयाचे श्रेय दिले ‘या’ भारतीयाला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---