सध्या भारतीय क्रिकेट संघात नियमित खेळणाऱ्या बऱ्यचशा खेळाडूंचे लग्न झाले आहे. पण काही असेही खेळाडू आहेत जे अजून सिंगल आहेत किंवा जे अजून खूप युवा आहेत किंवा ज्यांना गर्लफ्रेंड आहे, पण अजून त्यांचे लग्न झालेले नाही.
अशा अजून लग्न न झालेेल्या भारतीय क्रिकेटपटूंचा एक 11 जणांचा संघ होऊ शकतो तो असा –
१. पृथ्वी शॉ – शॉ तसा अजून खूप युवा आहे. तो सध्या केवळ २० वर्षांचा आहे. त्यामुळे त्याला कायद्याने लग्नाची परवानगी नाही. शॉने २०१८ ला वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने या पदार्पणाच्या सामन्यातच १३४ धावांची शतकी खेळी केली. त्यानंतर त्याने २०२० ला वनडे पदार्पणही केले आहे.
त्याने आत्तापर्यंत ४ कसोटी सामने आणि ३ वनडे सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने ५५.८३ च्या सरासरीने ३३५ धावा केल्या आहेत. तसेच वनडेमध्ये २८ च्या सरासरीने ८४ धावा केल्या आहेत.
२. केएल राहुल – मागील काही महिन्यांपासून शानदार फॉर्ममध्ये असणारा केएल राहुलचेही अजून लग्न झालेले नाही. पण मागील काही दिवसांपासून २८ वर्षीय केएल राहुलचे अथिया शेट्टी बरोबर नाव जोडले जात आहे. ती त्याची गर्लफ्रेंड असल्याची चर्चाही आहे. अथिया ही बॉलिवूड अभिनेत्री असून सुनील शेट्टीची मुलगी आहे. या दोघांनीही एकमेकांबरोबरचे फोटो याआधी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
केएलनेे आत्तापर्यंत ३६ कसोटी सामने खेळले असून ३४.५८ च्या सरासरीने २००६ धावा केल्या आहेत. तसेच ३२ वनडे आणि ४२ टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे १२३९ धावा आणि १४६१ धावा केल्या आहेत.
https://www.instagram.com/p/B6mw63tgkxp/
३. रिषभ पंत – २२ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचे अजून लग्न झालेले नाही. पण त्याला गर्लफ्रेंड आहे. याबद्दल त्याने खूलासाही केला आहे. त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव इशा नेगी आहे. रिषभ आणि इशाचे मागील अनेक वर्षापासून एकमेकांशी प्रेमसंबंध आहेत. मध्ये ते एकत्र फिरायला गेले होते, तेव्हाचे फोटोही त्या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.
२०१७ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रिषभने आत्तापर्यंत १३ कसोटी, १६ वनडे आणि २८ टी२० सामने असे मिळून ५७ सामने खेळले असून १५९८ धावा केल्या आहेत. यात त्याच्या कसोटीतील २ शतकांचा समावेश आहे.
https://www.instagram.com/p/B60_hRaHdry/?utm_source=ig_embed
४. श्रेयस अय्यर – मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरचेही अजून लग्न झालेले नाही. तसेच अजूनतरी त्याच्याशी कोणाचे नाव जोडलेले नाही किंवा त्यानेही याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही.
२०१७ मध्ये अय्यरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत १८ वनडे आणि २२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे ७७८ आणि ४१३ धावा केल्या आहेत. तसेच वनडेत त्याने १ शतकही केले आहे.
५. शिवम दुबे – मुंबईचा अष्टपैलू क्रिकेटपटू शिवम दुबेच्या अफेअरचीही चर्चा कधी झालेली नाही. त्यानेही याबद्दल वाच्चता केलेली नाही. २६ वर्षीय शिवमने २०१९ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणाऱ्या शिवमने आत्तापर्यंत १ वनडे आणि १३ टी२० सामने खेळले असून यात मिळून ११४ धावा केल्या आहेत आणि ५ विकेट्स घेतल्या आहेत.
६. विजय शंकर – २९ वर्षीय विजय शंकरचा लग्न अजून झालेले नाही. तसेच त्याच्याशी कोणाचे नाव जोडले गेल्याचीही चर्चा नाही. पण त्याचे वय पहाता तो लवकरच लग्नबंधनात अडकू शकतो. तमिळनाडूकडून देशांतर्गत क्रिकेट खेळलेल्या शंकरने २०१८ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण केले होते.
अष्टपैलू क्रिकेटपटू असणाऱ्या शंकरने २०१९ विश्वचषकासाठीही भारतीय संघात स्थान मिळवले होते. त्याने आत्तापर्यंत १२ वनडे आणि ९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहे. यात मिळून त्याने ३२४ धावा आणि ९ विकेट्स घेतल्या आहेत.
७. हार्दिक पंड्या – भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने यावर्षाच्या सुरुवातीलाच सर्बियन अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकबरोबर साखरपूडा केला आहे. त्याने तिला एंगेजमेंट रिंग घातलेला फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर देखील केला आहे. पण अजून तरी त्यांचे लग्न झालेले नाही.
हार्दिक मागील अनेक महिन्यांपासून पाठिच्या दुखापतीमुळे भारतीय संघातून दूर होता. त्याने आत्तापर्यंत ११ कसोटी, ५४ वनडे आणि ४० टी२० सामने खेळले आहेत. यात मिळून त्याने १७९९ धावा केल्या आहेत आणि १०९ विकेट्स घेतल्या आहेत.
https://www.instagram.com/p/B6xrw7WlubB/?utm_source=ig_embed
८. कुलदीप यादव – २५ वर्षीय चायनामन गोलंदाज कुलदीप यादवचे कोणाबरोबरही अफेअर असल्याचे आत्तापर्यंत ऐकिवात नाही. किंवा त्यानेही याबद्दल कुठेही वाच्चता केलेली नाही. त्याने २०१७ ला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात पदार्पण केले होते. तसेच तो वनडेमध्ये दोनवेळा हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज आहे.
त्याने आत्तापर्यंत ५ कसोटी सामने, ६० वनडे आणि २१ टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे २४, १०४ आणि ३९ विकेट्स घेतल्या आहेत.
९. युजवेंद्र चहल – सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक ऍक्टिव्ह असणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये चहलदेखील आहे. तसेच तो त्याच्या टिकटॉक व्हिडिओमुळेही सध्या चर्चेत आहे.
२९ वर्षीय चहलने अजून लग्न केलेले नसले तरी काही दिवसापूर्वी त्याचे कन्नड अभिनेत्री तनिष्का कपूरशी नाव जोडले होते. पण याबद्दल तनिष्काने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. मात्र चहलने त्यांच्यात केवळ मैत्री असल्याचे म्हटले होते.
चहल हा भारताच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघातील नियमित सदस्य असून त्याने आत्तापर्यंत ५२ वनडे आणि ४२ टी२० सामने खेळले आहेत. तसेच १४६ विकेट्स त्याने घेतल्या आहेत.
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) April 23, 2018
१०. जसप्रीत बुमराह – भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची लोकप्रियता मोठी आहे. त्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा होत असतात. मध्यंतरी बुमराहबरोबर दक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनचे नाव जोडले गेले होते.
त्याने तिच्या एका पोस्टवर कमेंट केल्याने त्यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. पण यावर बुमराहने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र अनुपमाने ते केवळ चांगले मित्र असल्याचे स्पष्ट केले होते.
बुमराहने आत्तापर्यंत १४ कसोटी, ६४ वनडे आणि ५० टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे ६८, १०४ आणि ५९ विकेट्स घेतल्या आहेत. तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज आहे.
११. शार्दुल ठाकूर – २८ वर्षीय शार्दुल ठाकूरच्या अफेअरची चर्चा कधी झालेली नाही. त्यानेही याबद्दल वाच्चता केलेली नाही. तसेच आत्तापर्यंत कधी त्याचे नाव कोणत्याही मुलीबरोबर जोडले गेल्याचे ऐकिवात नाही.
ठाकूरने २०१७ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने तेव्हापासून आत्तापर्यंत १ कसोटी, ११ वनडे आणि १५ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने मिळून ३२ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख –
७ असे खेळाडू ज्यांच्याबरोबर रोहित खेळला आहे क्रिकेट, पण नाव कुणालाही नाही आठवत
ड्रीम ११: फक्त कन्यारत्नं असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंची ड्रीम टीम इंडिया
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ महाराष्ट्रीयन खेळाडू