---Advertisement---

मध्यपानाची संस्कृती ही केवळ इंग्लंडमध्ये नाही, तर थेट क्रिकेटमध्येच आहे; बेन स्टोक्सचा दावा

On: मंगळवार, ऑगस्ट 4, 2026 9:49 PM
---Advertisement---

पिण्याची संस्कृती फक्त इंग्लंडमध्ये नाही तर क्रिकेटमध्येच आहे असं मत इंग्लंडचा माजी कर्णधार बेन स्टोक्सने व्यक्त केलं आहे. क्रिकेटच्या संस्कृतीत पिण्याचा विषय खोलवर रुजला आहे असंही तो म्हणाला.

‘फॉर द लव्ह ऑफ क्रिकेट’ या पॉडकास्टमध्ये स्टोक्स, जोस बटलर आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्याशी बोलत होता. सार्वकालीन महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणना होणाऱ्या स्टोक्सने काही दिवसांपूर्वीच निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर स्टोक्ससह इंग्लंडच्या संघातील काही सहकारी नाईटक्लबमध्ये गेले होते. इंग्लंडच्या संघासाठी नाईटकर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्या नियमांचं उल्लंघन करून स्टोक्स आणि गस अ‍ॅटकिन्सन नाईटक्लबमध्ये थांबले. तिथे इंग्लंडच्या एका रग्बी खेळाडूशी त्यांची बाचाबाची झाली. प्रकरण हाताबाहेर जाण्याआधी सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप केला. याप्रकरणामुळे स्टोक्स आणि अ‍ॅटकिन्सन यांचा दुसऱ्या टेस्टसाठी विचार करण्यात आला नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने तटस्थ निरीक्षकाद्वारे प्रकरणाचा तपास केला. यामध्ये स्टोक्स आणि अ‍ॅटकिन्सन दोषी नसल्याचं स्पष्ट झालं. स्टोक्स आणि अ‍ॅटकिन्सन तिसऱ्या टेस्टमध्ये खेळले. मात्र या टेस्टदरम्यान स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार असल्याचं जाहीर केलं.

याचा संदर्भ देत स्टुअर्ट ब्रॉडने इंग्लंड क्रिकेटमध्ये पिण्याची संस्कृती आहे का असं विचारलं. त्यावर बोलताना स्टोक्स म्हणाला, ‘नाही. हा मुद्दा एका राष्ट्रीय संघापुरता मर्यादित नाही. क्रिकेटमध्येच पिण्याची संस्कृती आहे आणि ती आताची नाही, अनेक वर्षांपासूनची आहे. आपण 2026 मध्ये आहोत, खेळ अधिकाअधिक व्यावसायिक झाला आहे. क्लब क्रिकेटपासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत सगळीकडे पिण्याचा विषय रुजलेला आहे’.

‘पोषक आहार, वैद्यकीय चमूची साथ, खेळाडूंची तयारी हे सगळं असलं तरी पिण्याची संस्कृती आहेच याचा स्टोक्सने पुनरुच्चार केला. तो खेळाचाच भाग आहे. क्रिकेट आणि मद्यपान हा संबंध जुनाच आहे. लोकांना वाटतं की हे फक्त इंग्लंड क्रिकेटपुरतंच आहे. पण तसं नाहीये’.

स्टोक्सने 122 टेस्ट, 114 वनडे आणि 43 टी20 सामन्यात इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं. 2019 वनडे वर्ल्डकप आणि 2022 टी20 वर्ल्डकपविजेत्या संघांचा स्टोक्स अविभाज्य भाग होता. 2022 ते 2026 कालावधीत त्याने इंग्लंड टेस्ट संघाचं नेतृत्वही केलं.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---