सोमवार, 14 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाकडून पुरस्कार घोषित केले गेले. यामध्ये मानाचा समजला जाणारा द्रोणाचार्य क्रीडा पुरस्कार रायगड जिल्ह्यातील सुमा सिद्धार्थ शिरूर यांना जाहीर करण्यात आला. सुमा मुळच्या रायगड जिल्ह्यातील नवीन पनवेलच्या राहणाऱ्या आहेत. यापूर्वी त्यांना 2003 साली केंद्र सरकारचा अर्जुन पुरस्कार देखील मिळाला होता.
सुमा शिरूर (Suma Shirur) यांना केंद्राचा द्रोणाचार्य पुरस्कार (Dronacharya Award 2022) जाहीर होताच त्यांचे सर्वत्र कौतुक केले जाऊ लागले. रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, पनवेल महापालिकेचे आयुक्त, तसेच राजकीय क्षेत्रांतील अनेकांनी त्यांचे अभिनंतर केले आहे. सोशल मीडियावर या सर्वांनी पोस्ट शेअर करत त्यांचा कामगिरीसाठी दाद दिली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर नेमबाजी स्पर्धांमध्ये सुमा यांनी आजपर्यंत अनेक पदके जिंकली आणि देशाचे नाव उंचावले. त्यानंतर ‘पॅरा शुटिंग’मध्ये प्रक्षिक्षकांच्या भूमिकेत त्यांनी अनेक खेळाडू तयार केले. या खेळासाठी त्यांचे योगदान खूप महत्वाचे असून केंद्र सरकारणेही त्याची दखल घेतल्याचे पाहायला मिळाले.
“पॅरा शूटिंग” या खेळ प्रकारात क्रीडा मार्गदर्शन केले असल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविल्यामुळे रायगड जिल्ह्यातील सुमा सिद्धार्थ शिरूर यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक म्हणून द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर.. (1/2)#DronacharyaAward #Raigad pic.twitter.com/EDTf9Jt959
— Raigad District Collector (@CollectorRaigad) November 15, 2022
सोमवारी जाहीर करण्यात आलेला हा पुरस्कार राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते 30 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवना याठिकाणी देण्यात येईल. रायगड जिल्हा माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून याविषयी माहिती दिली गेली आहे. दरम्यान, सोमवारी भारतीय क्रीडा मंत्रालयाकडून सुमा शिरूर यांच्यासह इतरही खेळाडू आणि प्रशिकांना पुरस्कार जाहीर केले गेले. यामध्ये वरिष्ठ टेनिसपटू अचंता शरथ कमल याला मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार मिळाला. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतासाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या एकूण 25 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर केला गेला.
#रायगड जिल्ह्यातील सुमा सिद्धार्थ शिरूर यांना #द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर…
"#पॅराशूटिंग" या खेळ प्रकारात क्रीडा मार्गदर्शन केले असल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविल्यामुळे उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक म्हणून द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर… pic.twitter.com/22xIK8TIXy— जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग (@InfoRaigad) November 15, 2022
सुमा शिरूर याच्याप्रमाणेच दिनेश लाड यांना देखील द्रोणाचार्य पुरस्कार घोषित केला गेला. दिनेश लाड मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील मोठे नाव मानले जाते. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने दिनेश यांच्याच मार्गदर्शनात क्रिकेटचे धडे घेतले आहेत. (Dronacharya Award of Central Govt announced to Suma Shirur)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL 2023: केकेआरला दुसरा झटका, बिलिंग्जनंतर कर्णधारानेही ट्विट करत पुढच्या हंगामात खेळण्यास दिला नकार
डेविड वॉर्नरने अशी काय चूक केली, ज्यामुळे मागावी लागली रश्मिकाची माफी? पाहा व्हिडिओ