भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवला सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात संधी मिळालेली नाही. तसेच मागील महिन्यात पार पडलेल्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या टी20 मालिकेसाठीही त्याला भारतीय संघात संधी देण्यात आली नव्हती.
याबद्दल कुलदीपने म्हटले आहे की निवड न झाल्याची चिंता वाटत नाही. या संधीचा उपयोग भारत अ संघाकडून खेळत कसोटी क्रिकेटसाठीचे गोलंदाजी कौशल्य आणखी चांगल्याप्रकारे आत्मसात करण्यासाठी होऊ शकतो.
द हिंदू आणि डेक्कन हेराल्डशी बोलताना कुलदीप म्हणाला, ‘मी मागील दोन टी20 मालिकेत निवड न झाल्याची चिंता करत नाही. कदाचित निवड समीतीला वाटले असेल की मला विश्रांतीची गरज आहे. कदाचित संघाला वाटत असेल की काही बदल करण्याची गरज आहे.’
‘मी या निर्णयाचा सन्मान करतो. माझी याबद्दल कोणतीही तक्रार नाही. मी कसोटीमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी ही संधी असल्याचा विचार करत आहे.’
कुलदीप कसोटीत भारताचा फिरकी गोलंदाजीसाठी रविंद्र जडेजा आणि आर अश्विननंतरची तिसरी पंसती असण्याची शक्यता आहे. कसोटीमध्ये खेळण्याबद्दल कुलदीप म्हणाला, ‘जेव्हा तूम्ही सातत्याने कसोटी क्रिकेट खेळत नसता त्यावेळी या क्रिकेट प्रकारामध्ये खेळणे कठिण आहे.’
‘जर तूम्ही कसोटी क्रिकेट प्रकारात नियमित नसाल तर तूम्हाला लयीत येण्यासाठी वेळ लागतो. जेव्हा तूम्ही सातत्याने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळता आणि अचानक तूम्हाला जास्त तयारी न करता कसोटी क्रिकेट खेळावे लागते तेव्हा खेळणे अत्यंत कठिण होते.’
‘तूम्हाला अनेक षटके सलग गोलंदाजी करावी लागते. सराव सामने खेळावे लागतात. मैदानावरील क्षेत्ररक्षण समजून घ्यावे लागते आणि विकेट कशी मिळवायची हे समजून घ्यावे लागते. माझ्यासाठी इथे येऊन शक्य तेवढे षटके गोलंदाजी करायला मिळणे महत्त्वाचे आहे. अजून खूप काम करायचे आहे.’
‘जेव्हा संघात अश्विन, जडेजा आणि मी असे तीन फिरकी गोलंदाज असतात तेव्हा योग्य मिश्रणासह संघ निवडणे आव्हानात्मक असते. तूम्ही तूमच्या संधीचा फायदा घेण्यासाठी तयार राहिले पाहिजे. नक्कीच दबाव असतो कारण खूप कमी संधी मिळणार असतात आणि त्याचा पूर्ण उपयोग करायचा असतो.’
कुलदीपचा 2 ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सुरु होणाऱ्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठीही भारतीय संघात समावेश आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–धोनी की पॉटिंग, कोण आहे आवडता कर्णधार? ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाने दिले हे उत्तर
–या कारणामुळे भारतात कसोटी खेळण्यासाठी येताना भडकला फाफ डू प्लेसिस
–आयसीसीला राहुल द्रविडबाबत केलेली ही चूक पडली महागात, चाहत्यांनी केले ट्रोल