पुणे, 2 एप्रिल 2017ः पुणे जिल्हा फुटबॉल संघटना(पीडीएफए)यांच्या तर्फे आयोजित डीएसके टोयोटा पुणे फुटबॉल लीग स्पर्धेत सुपर डिव्हिजन श्रेणी गटात एफसी पुणे सिटी ब, डीएसके शिवाजीयन्स अ आणि परशुरामियन्स एससी या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
लोणी येथील डीएसके फुटबॉल मैदान आणि बीईजी फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात ईशान डे, तिमोथाय तंकुलिया यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर एफसी पुणे सिटी ब संघाने डीएसके शिवाजीयन्स ब संघाचा 2-0असा पराभव केला. डीएसके शिवाजीयन्स अ संघाने बिशप्स एफसी अ संघाचा 5-0असा धुव्वा उडविला. विजयी संघाकडून नारोहरी श्रीष्टाने दोन गोल, तर प्रांजल भुहाटी, लालपुईया, वानलालरीमा किमा यांनी प्रत्येकी एक गोल केला. परशुरामियन्स एससी संघाने आयफा स्काय हॉक्सचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव केला.
प्रथम श्रेणी गटात सुपर सिक्स साखळी फेरीत कमांडोज एफसी संघाने टायगर कंबाईनचा 3-1 असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: सुपर डिव्हिजन श्रेणी गट:
एफसी पुणे सिटी ब: 2(ईशान डे 5मि., तिमोथाय तंकुलिया 84मि.)वि.वि.डीएसके शिवाजीयन्स ब: 0;
डीएसके शिवाजीयन्स अ: 5(नारोहरी श्रीष्टा 10, 40मि., प्रांजल भुहाटी 36मि., लालपुईया 85मि., वानलालरीमा किमा 88मि.)वि.वि.बिशप्स एफसी अ: 0;
सीएमएस फाल्कन: 0 बरोबरी वि.डेक्कन रोव्हर्स एफसी: 0;
परशुरामियन्स एससी: 3(हिलीव येबी 22मि., राहुल घोडे 44मि., निखिल पडवळ 45मि.)वि.वि.आयफा स्काय हॉक्स: 2(चिराग सहाणे 31, 58मि.)
प्रथम श्रेणी गट: सुपर सिक्स साखळी फेरी:
कमांडोज एफसी: 1(आदर्श रोटेल्लू 8मि., मेल्वीन सुजेन ३३मि., मार्शल रॉड्रिक्स ५२मि )वि.वि.टायगर कंबाईन:१(अथर्व राऊत ३४मि) .