-अनिल भोईर
दुबई येथे सुरू असलेल्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये इराणने पाकिस्तान संघाचा पराभव करत दुबई कबड्डी मास्टर्सच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. तर भारतीय संघ दक्षिण कोरियावर विजय मिळत अंतिम फेरीत दाखल झाला.
काल,29 जूनला झालेल्या उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ दाखवत ७-३ अशी भारताविरुद्ध आघाडी मिळवली होती. पण भारताचा कर्णधार अजय ठाकूरने झटपट चढाय्या करत गुण मिळवले. मध्यंतरापर्यंत १७-१० अशी सामन्यात आपली पकड मिळवली.
अजय ठाकूरने सर्वाधिक ११ गुण मिळवले. त्यामध्ये चढाईत १० गुण तर पकडी मध्ये १ गुणांचा समावेश होता. चढाईमध्ये अजयला मोनू गोयातची चांगली साथ मिळाली.
भारतीय संघात पहिल्यांदाच निवड झालेला महाराष्ट्राचा गिरीश एर्नाक कबड्डी मास्टर्समध्ये जबरदस्त खेळ करत आहे. गिरीश त्याच्या पकडीनी विरुद्ध संघातील खेळाडूंना जाळ्यात अडकवत आहे. त्याने उपांत्य सामन्यात सर्वाधिक ७ पकडी करून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
गिरीश एर्नाक कबड्डी मास्टर्समध्ये कमालीच्या पकडी करत आहे. त्याने आतापर्यंत कबड्डी मास्टर्समध्ये भारताकडून दोन हाय फाय केले आहेत. गिरीशने ४ सामने खेळले असून त्यामध्ये १६ पकडी केल्या आहेत.
अजय ठाकूर व गिरीश एर्नाकच्या खेळीने भारताने दक्षिण कोरियाचा ३६-२० असा सहज पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. कबड्डी मास्टर्सच्या अंतिम सामन्यात भारत इराणशी दोन हात करणार आहे.
इराण विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात इराणने सुरुवाती पासून सामन्यावर पकड मिळवली होती. मध्यंतरापर्यंत इराणने १९-०९ अशी आघाडी घेतली होती. पाकिस्तानने सामन्यामध्ये पकड मिळवण्यासाठी प्रयत्न केले पण त्यांना अपयश आले. इराणने ४०-२१ असा सामना जिंकत अंतिम फेरी गाठली.
कबड्डी मास्टर्स दुबई २०१८ महाअंतिम मुकाबला:
३० जून २०१८ ( रात्री ०८:०० वाजता)
भारत विरुद्ध इराण
महत्त्वाच्या बातम्या: