---Advertisement---

न्यूझीलंडचा दिग्गज अष्टपैलू मुख्य धमनी फुटल्यामुळे रुग्णालयात दाखल; देतोय मृत्यूशी झुंज

On: बुधवार, ऑगस्ट 11, 2021 12:44 AM
---Advertisement---

नुकतेच न्यूझीलंड टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला होता. मात्र, आता न्यूझीलंडच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. न्यूझीलंड संघाचा माजी क्रिकेटपटू क्रिस क्रेंसची प्रकृती बिघडली आहे. क्रेंसला सध्या ऑस्ट्रेलियातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. क्रेंसची स्थिती सध्या खूप गंभीर आहे.

न्यूझीलंडमधील वृत्तपत्र, ‘न्युझीलँड हेराल्ड’नुसार, “त्यांची मुख्य वाहिनी फुटल्यामुळे क्रेंसला आपत्कालीन सेवेअंतर्गत, मागील आठवड्यात ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच लवकरच क्रेंसला तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनासाठी सिडनीला हलवले जाऊ शकते.”

एका वृत्तानुसार क्रेंसवर आतापर्यंत अनेक वेळा शस्त्रक्रिया करण्यात आले. परंतु या शस्त्रक्रियेचा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम झालेला दिसून आला नाही. क्रेंसचे वडील लांस क्रेंस यांनी देखील न्यूझीलंड संघाकडून क्रिकेट खेळले आहे.

५१ वर्षीय क्रेंस न्यूझीलंड संघाचा एक अत्यंत उत्कृष्ट खेळाडू होता. त्याला त्या काळातील एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून गणले जायचे. क्रेंसने न्यूझीलंड संघाकडून एकूण ६२ कसोटी सामने खेळले आहेत. तर २१५ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याचबरोबर २ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने देखील क्रेंसने खेळले आहेत. त्याचबरोबर क्रेंसनी समालोचन देखील केले आहे.

क्रेंस हे गेल्या काही काळापासून स्मार्ट स्पोर्ट्स नावाच्या एका कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सध्या तो त्याच्या पत्नी आणि मुलांसोबत ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा शहरात राहत आहेत. दरम्यान, क्रेंसवर मॅच फिक्सिंगचे देखील आरोप लावण्यात आले होते. मात्र, २०१५ मध्ये क्रेंसची या सर्वातून मुक्तता झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या –
हाँगकाँगकडून २०१४ टी२० विश्वचषकात खेळलेला ‘हा’ खेळाडू आता खेळणार न्यूझीलंडकडून
‘इंग्लंडसाठी किती सूटकेस भरून कपडे आणलेस’ दिनेश कार्तिकचा ‘हा’ फोटो पाहून ऑसी क्रिकेटरचा प्रश्न
इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ जिंकेल कसोटी मालिका, पाकिस्तानी दिग्गजाने बांधले कौतुकाचे पूल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---