Rohit Sharma On Shubman Gill: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शुबमन गिल सलामीऐवजी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. गिलला सेंच्युरियनमध्ये ही स्थिती अजिबात आवडली नाही आणि पहिल्या डावात 2 धावा आणि दुसऱ्या डावात 26 धावा करून तो बाद झाला.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यामुळे शुबमन गिल (Shubman Gill) याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली. दुसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी खुद्द हिटमॅननेच याचा खुलासा केला होता. पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, “मला तिसऱ्या क्रमांकावर खेळणे अजिबात आवडत नाही. व्यक्तिशः, मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणे अजिबात आवडत नाही. तुम्ही एकतर डावाची सुरूवात करा किंवा थोडा वेळ थांबा आणि पाच किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला या. मी जेव्हापासून सलामीला सुरुवात केली, तेव्हापासून मधल्या फळीत फलंदाजीची करणे मला आवडत नाही.” (Due to Rohit Sharma, Shubman Gill has to bat at number three)
शुबमन गिलचे कौतुक करताना भारतीय कर्णधार म्हणाला की, तो खूप हुशार क्रिकेटर आहे आणि त्याला त्याची फलंदाजी चांगलीच समजते. तो म्हणाला, “गिल खूप हुशार आहे आणि त्याला त्याची फलंदाजी खूप चांगली समजते. त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आवडते. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये या स्थानावर फलंदाजी केली आहे. त्याने केवळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येच सलामी केली आहे. “त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी केली आहे. आहे. पण तो त्याचा स्वतःचा निर्णय होता. त्याला वाटते की तो या स्थानावर संघासाठी चांगले योगदान देऊ शकतो.” (Due to Rohit Shubman Gill has to play at number three the captain himself revealed)
हेही वाचा
ICCने केली ‘इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर’साठी खेळाडूंची घोषणा, भारताच्या ‘या’ स्फोटक सलामीवीराचाही समावेश
AUS vs PAK: कारकीर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात David Warner मित्र Philip Hughesच्या आठवणीत झाला भावूक