---Advertisement---

वेस्ट इंडिज दौऱ्यात भारताने पाहिला पहिला पराभव, ‘या’ ३ खेळाडूंमुळे ओढावली नामुष्की

On: मंगळवार, ऑगस्ट 2, 2022 2:07 PM
Shreyas-Iyer-1
---Advertisement---

वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील दुसरा टी२० सामना पाहुण्यांनी ५ विकेट्स राखून गमावला. या सामन्यात यजमान वेस्ट इंडिज संघाने गोलंदाजीत प्रभावी प्रदर्शन करत सामना आपल्या बाजूने फिरवला होता. त्यानंतर वेस्ट इंडिजचा सलामीवीर ब्रेंडन किंग याने झंझावाती अर्धशतकी खेळी करत संघाला विजय संपादन करून दिला.

या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी फळी पूर्णपणे फ्लॉप ठरली. भारताच्या बऱ्याचशा स्टार खेळाडूंनी अतिशय खराब खेळ दाखवला, ज्यामुळे भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याच भारतीय संघाच्या पराभवाला जबाबदार ठरलेल्या खेळाडूंबद्दल या लेखात आढावा घेण्यात आला आहे.

१. श्रेयस अय्यर- 
वेस्ट इंडिज दौऱ्यावर विराट कोहलीच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) खेळवण्यात येत आहे. परंतु श्रेयस विराटची पोकळी भरून काढू शकला नाही. दुसऱ्या टी२० सामन्यातही सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा शून्य धावेवर बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या श्रेयसवर डाव सावरण्याची जबाबदारी होती. परंतु तो ११ चेंडूत फक्त १० धावा करून बाद झाला. इतकेच नव्हे तर पहिल्या टी२० सामन्यातही त्याला आपले खाते खोलता आले नव्हते.

२. रिषभ पंत- 
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतही (Rishabh Pant) जास्त कमाल दाखवू शकला नाही. तो वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांपुढे आक्रमक होऊन फलंदाजी करत होता. त्याने १२ चेंडूत २ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने २४ धावाही केल्या. परंतु चांगल्या सुरुवातीनंतर तो जास्त वेळ मैदानावर टिकण्यात अपयशी ठरला. एका खराब फटक्यावर वेस्ट इंडिजचा गोलंदाज अकिल हुसैनने ओडियन स्मिथच्या हातून त्याला सहज झेलबाद केले.

३. आर अश्विन-
वेस्ट इंडिजविरुद्ध फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) खूप महागडा ठरला. त्याच्या गोलंदाजीवर विरोधी संघाच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली. त्याने आपल्या कोट्यातील ४ षटके फेकताना ३२ धावा देत फक्त एकच विकेट घेतली. अश्विनने दीर्घ काळानंतर टी२० क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. परंतु त्याला अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. यानंतर आता तिसऱ्या टी२० सामन्यातून त्याला बाहेर केले जाऊ शकते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

एकाच सामन्यात पाहायला मिळाले तीन अर्शदीप सिंग, एक ओरिजनल तर दोघांची ‘पगडी’ गायब

पराभवानंतर वाढले भारतीय संघाचे टेंशन, फॉर्मात असलेला ‘हा’ गोलंदाज तिसऱ्या टी२०तून बाहेर

दुसऱ्या टी२० नंतर आता तिसऱ्या सामन्यालाही उशीर, जाणून घ्या किती वाजता सुरू होणार मॅच?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---