लखनऊ सुपर जायंट्सचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक याला एलिमिनेटर सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. मुंबई इंडियन्स आणि लकनऊ सुपर जायंट्स यांच्यातील हा सामना बुधवारी (24 मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियवर झाला. मुंबईने यात 81 धावांनी विजय मिळवला आणि लखनऊचा हंगामातील प्रवास पराभवानंतर इथेच संपला. सामना संपल्यानंतर क्विंटन डी कॉकला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर का ठेवले, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. लखनऊचा कर्णधार कृणाल पंड्या याने या प्रश्नाचे उत्तर दिले.
क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आयपीएलमध्ये नेहमीच अप्रतिम प्रदर्शन करत आला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील त्याचा अनुभव दांडगा म्हणता येईल. असे असले तरी, मुंबई इंडियन्सविरुद्धच्या इलिमिनेटर सामन्यात लखनऊ संघ व्यवस्थापनाकडून डी कॉकला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाळी नाही. कायल मेयर्स (Kyle Meyers) लखनऊच्या फलंदाजीवेळी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीसाठी मैदानात आला. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. मेअर्सने 13 चेंडूत 18 धावा केल्या आणि कॅमरून ग्रीनच्या हातात झेलबाद झाला. सामना संपल्यानंतर कृणाल पंड्याने डी कॉकच्या आधी मेअर्सला खेळवण्याचे कारण स्पष्ट केले. कर्णधाराच्या मते यष्टीरक्षक फलंदाज डी कॉकपेक्षा मेअर्सची आकडेवारी चांगली असल्यामुळे इंम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्याला खेळवले गेले.
सामना संपल्यानंतर लखनऊचा कर्णधार कृणाल पंड्या म्हणाला, “निश्चितच हा निर्णय नेहमी अवघड अशतो. क्विंटन डी कॉक एक दर्जेदार खेळाडू आहे आणि जागतिक दर्जाची फलंदाजही आहे. पण काय मेअर्सची आकडेवारी याठिकाणी चांगली होती. हा निर्णय आमच्यासाठी खूप कठीण होतो. पण अखेरीस कायल मेअर्सला संधी मिळाली पाहिजे, असे आम्हाला वाटते.”
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. निर्धारित 20 षटकांमध्ये मुंबईचे फलंदाज 8 बाद 182 धावांपर्यंत मजल मारू शकले. प्रत्युत्तरात लखनऊ सुपर जायंट्स संघ 16.3 षटकांमध्ये 101 धावा करून सर्वबाद झाला. परिणामी मुंबईने हा सामना तब्बल 81 धावांच्या अंतराने जिंकला. आकाश मधवाल मुंबईसाठी मॅच विनर ठरला. आकाशने 3.3 षटकात अवघ्या 5 धावा खर्च करून 5 विकेट्स घेतल्या. (Due to this reason, Quinton de Kock did not get a chance in the playing eleven in the eliminator match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल फायनलवेळी होणार आशिया चषकाचा निर्णय, पीसीबीला वगळून बैठकीचे आयोजन
इंजीनियर ते क्रिकेटर… असा आहे मुंबईचा तारणहार आकाश मढवालचा क्रिकेट प्रवास