---Advertisement---

भारतीय संघाला नवीन चेंडू सांगून दिलेला जुना चेंडू? वाचा काय नेमकं प्रकरण

On: गुरूवार, डिसेंबर 30, 2021 4:44 PM
Team India
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India)  या दोन्ही संघांमध्ये सेंच्युरियनच्या मैदानावर पहिला कसोटी सामना सुरू आहे. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघासमोर ३०५ धावांचे लक्ष्य आहे. या धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवस (२९ डिसेंबर) अखेर दक्षिण आफ्रिका संघाला ४ बाद ९४ धावा करण्यात यश आले होते. दरम्यान या सामन्याच्या चौथ्या दिवशी असा काहीसा प्रकार घडला होता. ज्यामुळे सामना काही वेळासाठी थांबवण्यात आला होता.

तर झाले असे की, या सामन्याच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघातील फलंदाज दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात आले होते. त्यावेळी कर्णधार विराट कोहलीने खेळ सुरू करण्यास नकार दिला होता. भारतीय खेळाडूंनी गोलंदाजीसाठी दिलेला कुकाबुरा चेंडू जुना असल्याचे सांगत बदलण्याची मागणी केली होती. ज्यामुळे हा सामना १० मिनिटांसाठी थांबवण्यात आला होता.

हे सर्व प्रकरण सुरू असताना भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि संघातील खेळाडू पंच मराइस इरासमस (Marais Erasmus) सोबत वाद घालताना दिसून आले होते. परंतु, त्यानंतर पंचांनी नवीन चेंडूचा बॉक्स मागवला आणि आर अश्विन (R ashwin) आणि संघातील गोलंदाजांना नवीन चेंडू निवडण्यास सांगितले. त्यानंतर हा सामना पुन्हा एकदा सुरू झाला.(Due to this reason South Africa vs India match stopped for few minutes)

अधिक वाचा – नेमकं चुकतंय तरी कुठं? विराट ऑफ-स्टंप लाईनबाहेर बाद होण्याबाबत फलंदाजी प्रशिक्षकांचे मोठे वक्तव्य

या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघासमोर विजयासाठी ३०४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी (३० डिसेंबर) दक्षिण आफ्रिका संघाला चांगली सुरुवात मिळाली. दक्षिण आफ्रिका संघाकडून कर्णधार डीन एल्गरने सर्वाधिक ७७ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिका संघाला हा सामना जिंकण्यासाठी अखेरच्या २ सत्रात १२३ धावांची गरज आहे, तर भारताला ३ विकेट्सही गरज आहे.

महत्वाच्या बातम्या :

‘ये कव्हर ड्राईव्ह तुम्हे बर्बाद कर देगा विराट..’, कडवट शब्दात नेटकरी करतायेत ट्रोल

“मला शमीमध्ये पोलॉक व अँडरसनची झलक दिसते”; दिग्गजाने उधळली स्तुतीसुमने

हे नक्की पाहा: टीम इंडियाला सोडलं, पण एअरपोर्टवर एकट्या हरभजनला पकडलं

टीम इंडियाला सोडलं, पण एअरपोर्टवर एकट्या हरभजनला पकडलं | HARBHAJAN FINED IN NEW ZEALAND

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---