वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करत होता. हार्दिकने या सामन्यात कर्णधारपदाला साजेशी केळी करत महत्वपूर्ण 70 धावांचे योगदान दिले. भारताने हा सामना 200 धावांनी जिंकला असून मालिका देखील 1-2 अशा अंतराने नावावर केली. सामना आणि मालिका जिंकल्यानंतर हार्दिकने आपल्या खेळीमागचे विराट कोहली याचा हात होता, हे स्पष्ट केले.
विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यात विश्रांती दिली गेली. या दोन दिग्गजांच्या अनुपस्थितीत संघाचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आले. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृतात मालिकेतील दुसरा वनडे सामना भारताने गमावला. पण तिसऱ्या सामन्यात संघातील जवळपास प्रत्येकाचे महत्वापूर्ण योगदान राहिले आणि सामना जिंकला. हार्दिकने 52 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 70 धावा कुटल्या. या खेळीसाठी विराटने दिलेला सल्ला महत्वाचा ठरला, ही गोष्ट स्वतः हार्दिकने मान्य केली.
पोस्ट मॅच सेरेमनीमध्ये हार्दिक म्हणाला, “विराट आणि रोहित संघाचा महत्वाचा भाग आहेत. पण त्यांना विश्रांती दिली गेली, जेणेकरून ऋतुराज गायकवाड यांसारख्या युवा खेळाडूंना संधी मिळेल. हा युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी घेतला गेलेला निर्णय आहे. मी जाणून बुजून दिरंगाई केली. मला खेळपट्टीवर वेळ घालवायचा होता. सामन्यापूर्वी विराटसोबत चांगली चर्चा झाली होती. मी खेळपट्टीवर वेळ घालवावा आणि 50 षटकांच्या सामन्याची सवाय लावून घ्यावी, अशी त्याची इच्छा होती. त्याचा अनुभव माझ्यासोबत शेअर करण्यासाठी मी त्याचा आभारी आहे.”
दरम्यान, उभय संघांतील या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 351 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीज संघ 35.3 षटकात 151 धावा करून सर्वबाद झाला. शुबमन गिल सामनावीर ठरला, ज्याने 92 चेंडूत 85 धावा केल्या, सोबतच दोन झेल देखील पकडले. ईशान किशन (77) आणि संजू सॅमसन (51) यांनीही अर्धशतके ठोकली. मुकेश कुमार (3 विकेट्स) आणि शार्दुल ठाकूर (4 विकेट्स) यांचे योगदान देखील महत्वपूर्ण ठरले. (Due to Virat Kohli’s advice, Hardik was able to score 70 runs in the third ODI against West Indies)
महत्वाच्या बातम्या –
‘भारतीय क्रिकेटपटू बनणे कठीण…’, अर्धशतक ठोकल्यानंतर असे का म्हणाला संजू सॅमसन?
सांघिक विजय! तिसऱ्या वनडेत वेस्ट इंडीज 200 धावांनी पराभूत, मालिका भारताच्या नावावर