अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे आयपीएलवरही त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे एलपीजीच्या तुटवड्यामुळे हादरल्यानंतर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल परिस्थितीचा आढावा घेत आहे.
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी मंगळवारी (१० मार्च) म्हटले, “सध्या सर्व भारतातील एलपीजी टंचाई परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.” पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅसच्या मंत्रालयाने सोशल मीडियामार्फक एक निवेदन जाहीर केले आहे. त्यामध्ये म्हटले की पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन पुरवठ्यातील अडचणींमुळे आवश्यक नसलेल्या देशांतर्गत क्षेत्रांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने केला जाईल.
धुमाळ यांनी मान्य केले की परिस्थिती आव्हाने निर्माण करू शकते परंतु आयपीएलला अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार मिळालेली नाही. त्यांनी पुढे म्हटले, “निश्चितच, हे एक आव्हान आहे. परंतु आम्हाला आतापर्यंत हॉटेल्सकडून काहीही माहिती मिळालेली नाही. जर काही समस्या असेल आणि त्यांनी आम्हाला कळवले तर आम्ही त्यानुसार त्याचा आढावा घेऊ.”
सद्यस्थिती पाहता अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध लवकर संपण्याची चिन्हे दिसत नाही. यामुळे त्याचा पेट्रोलियम आणि एलपीजी उत्पादनांच्या पुरवठ्यांवर मोठा परिणाम झाला आहे. काही रिपोर्ट्सनुसार, एलपीच्या टंचाईमुळे बेंगलोर आणि चेन्नईमधील हॉटेल व्यवसायिकांनी आधीच स्पष्ट केले की त्यांच्याकडे केवळ एक किंवा दोन दिवस पुरेल एवढाच एलपीजीचा पुरवठा शिल्लक आहे.
सध्या तरी आयपीएल २०२६चे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका असल्याने वेळापत्रकाला उशिर झाला आहे. तसेच बीसीसीआयने दोन भागांमध्ये वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये १२ मार्चपर्यंत पहिल्या २० दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
आयपीएल २०२६चा हंगाम आधी २६ मार्च ते ३० मे पर्यंत खेळला जाणार होता, मात्र त्यामध्ये अनेकदा बदल करण्यात आले आहेत.






आयपीएल सामन्यादरम्यान कमेंटेटरची मोठी चूक, BCCI अॅक्शन मोडमध्ये; माजी क्रिकेटपटू अडचणीत