---Advertisement---

कसोटी क्रिकेटमध्ये वापरतात चक्क इतक्या प्रकारचे चेंडू! भारतीय संघ वापरतो ‘हा’ चेंडू

---Advertisement---

कसोटी क्रिकेट हा जागतिक स्तरावर उत्कृष्ट दर्जाचा खेळ मानला जातो. सर्व संघ कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. कसोटीमध्ये खेळाडूंचा फिटनेस असणे खूप महत्वाचे आहे. इतिहासातील पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात 1877 साली खेळला गेला. पण अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्या प्रकारचा चेंडू वापरला जातो आणि त्याची खासियत काय आहे.? या बातमीद्वारे आपण कसोटीमध्ये कोणत्या प्रकारचे चेंडू वापरले जातात ते जाणून घेऊया.

1) ड्यूक्स बॉल- ड्यूक्स बॉल (Dukes Ball) टिकाऊपणासाठी खूप लोकप्रिय आहे. एका कसोटी सामन्यात, एका दिवसात 90 षटके टाकली जातात, त्यामुळे ड्यूक्स बॉल चांगल्या स्थितीत ठेवल्यास 50 षटकांनंतरही त्याची चमक कायम राहते. हा चेंडू इंग्लंड, आयर्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये वापरला जातो.

2) कूकाबुरा- कूकाबुरा कंपनीचे चेंडू ऑस्ट्रेलियात तयार होतात. त्यातील निम्मे हाताने आणि बाकीचे मशीनने शिवलेले आहेत. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, न्यूझीलंड आणि बांगलादेश या चेंडूचा वापर करतात. जेव्हा हवामान स्वच्छ असते आणि खेळपट्टीवर बाउन्स असतो तेव्हा कूकाबुरा चेंडू खूप प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

3) गुलाबी बॉल- कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे तर, 2015 साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळला गेला. दिवस-रात्र होणाऱ्या सामन्यांमध्ये गुलाबी चेंडूचा वापर केला जातो. लाल आणि पांढऱ्या चेंडूपेक्षा गुलाबी चेंडू जास्त स्विंग करतो, असा दावा अनेक क्रिकेटपटूंनी केला आहे.

4) एसजी- एसजी ही भारतीय कंपनी असून भारतात होणाऱ्या सामन्यांमध्ये हा चेंडू वापरला जातो. एसजी बॉलची सीम इतर बॉलपेक्षा थोडी वेगळी असते. कारण त्यात जाड धागा वापरला जातो. या चेंडूची शिलाई हाताने केली जाते.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल लिलावापूर्वी अर्जुन तेंडुलकरची गोलंदाजीत कमाल, एका सामन्यात घेतल्या 9 विकेट्स
एकाच सामन्यात 9 विकेट्स घेणाऱ्या ‘स्टार’ गोलंदाजाला कोहलीने गिफ्ट केली बॅट
भारताविरूद्ध कहर केलेल्या स्टार खेळाडूला आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार जाहीर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---