---Advertisement---

कॅप्टन अजिंक्य रहाणेचा संघ बनला चॅम्पियन! ठरली दुलीप ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात ‘यशस्वी’ टीम

West Zone
---Advertisement---

दुलीप ट्रॉफी 2022 (Duleep Trophy)चा अंतिम सामना साऊथ झोन विरुद्ध वेस्ट झोन यांच्यात झाला. हा सामना कोयंबतूर येथे रंगला. या सामन्यात अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखालील वेस्ट झोन संघाने साऊथ झोनचा 294 धावांनी पराभव केला आहे. या विजयाबरोबरच वेस्ट झोन या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. त्यांनी 19व्यांदा दुलीप ट्रॉफीचे विजतेपद पटकावले आहे. या विजयाचे नायक ठरले यशस्वी जायसवाल, जयदेव उनाडकट आणि शम्स मुलाणी.

या सामन्यात वेस्ट झोनचा कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विकेटकीपर हेत पटेल याने केलेल्या 98 धावांच्या जोरावर वेस्ट झोनने पहिल्या डावात 270 धावसंख्या उभारली. यावेळी जयदेव उनाडकट याने नाबाद 47 धावा केल्या. गोलंदाजीत साऊथच्या साई किशोर याने 5 विकेट्स घेतल्या. हनुमा विराही याच्या नेतृत्वाखालील साऊथने पहिल्या डावात 327 धावसंख्या उभारल्याने त्यांनी काहीशी आघाडी घेतली होती. यामध्ये बाबा इंद्रजीत याने 118 धावा केल्या, तर वेस्टकडून गोलंदाजीत उनाडकट याने सर्वाधिक अशा 4 विकेट्स घेतल्या. त्याला चिंतन गाजा (2) आणि अतित शेठ (3) यांनी योग्य मदत केली.

पहिल्या डावात फ्लॉप ठरलेल्या यशस्वी जायसवाल (Yashasvi Jaiswal) याने दुसऱ्या डावात झंझावाती द्विशतक झळकावले. त्याने 265 धावा केल्या. सरफराज खान 127 धावा आणि हेत पटेल 51 धावा करत नाबाद राहिले. यामुळे वेस्ट झोनने दुसऱ्या डावात 4 विकेट्स गमावत 585 धावांचा डोंगर रचला.

विजयासाठी लक्ष्याचा पाठलाग करताना साऊथ झोन शम्स मुलाणी (Shams Mulani), उनाडकट आणि शेठ यांच्या माऱ्यासमोर अधिक काळ टीकला नाही. यावेळी रोहन कुन्नूमल (93) आणि तेलूकुपल्ली रवी तेजा (53) यांनीच धावा केल्या. तर साऊथ 234 धावांवरच गारद झाला. मुलाणीने 4 तर उनाडकट आणि शेठ यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

सामनावीर जायसवाल ठरला तर मालिकावीराचा पुरस्कार उनाडकटने पटकावला. या स्पर्धेच्या हंगामात सर्वाधिक धावा वेस्टच्या जायसवालने केल्या आहेत. त्याने 3 सामन्यात 99.40च्या सरासरीने 497 धावा केल्या आहेत. सर्वाधिक विकेट्स साई किशोरने घेतल्या आहेत. त्याने 2 सामन्यात 17 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामध्ये त्याने दोन वेळा पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

दुलीप ट्रॉफीचे सर्वाधिक विजेतेपद पटकावण्यामध्ये नॉर्थ झोन (18) दुसऱ्या स्थानावर आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvsAUS | निर्णायक सामन्यात पाऊस करणार खोळंबा! हवामान खात्याने वर्तवलाय ‘असा’ अंदाज
तिसऱ्या टी20साठी रिषभ पंतचा पत्ता कट? जाणून घ्या कारण आणि भारताची संभावित प्लेईंग 11
झूलनला ‘परफेक्ट फेअरवेल’! सहकारी खेळाडूंनी खांद्यावर घेत दिली मानवंदना; पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---