भारताच्या स्थानिक क्रिकेटमधील प्रसिद्ध स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे सामने पार पडले. दुलीप ट्रॉफी (Duleep Trophy) 2022च्या दोन्ही उपांत्य फेरीचे सामने पार पडले असून अंतिम सामन्यातील संघ निश्चित झाले आहेत. यातील पहिल्या सामन्यात वेस्ट झोन संघाने सेंट्रल झोनला पराभूत केले, तर दुसऱ्या सामन्यात साउथ झोन संघाने नॉर्थ झोनला हरवले. यामुळे वेस्ट झोन विरुद्ध साउथ झोन अंतिम सामना 21सप्टेंबरपासून खेळला जाणार आहे.
अजिंंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्या नेतृत्वाखालील संघ वेस्ट झोनने सेंट्रल झोनला 279 धावांनी पराभूत केले. कोयंबतुर येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात चौथ्या दिवशी वेस्ट झोनच्या शम्स मुलाणी याने आपल्या फिरकीने विरोधी संघाला सळो की पळो करून सोडले. त्याने दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या.
मुलानीने 72 धावांत पाच, तर चिंतन गाझाने 49 धावांत तीन बळी घेतले. सेंट्रल संघासमोर 501 धावांचे लक्ष्य होते. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना सेंट्रलचा संघ केवळ 57.1 षटकांत 221 धावांत गारद झाला. सेंट्रलकडून रिंकू सिंगने 65 धावा केल्या, तर कुमार कार्तिकेय (39) आणि वेंकटेश अय्यर (नाबाद 32) यांनी उपयुक्त खेळी खेळली.
सेंट्रल झोनने 2 बाद 33 धावा करत दिवसाची सुरुवात केली. कार्तिकेय आणि शुभम शर्मा (24) यांनी पहिल्या सत्रात वेस्ट झोनच्या गोलंदाजांना यशापासून रोखले आणि संघाची धावसंख्या 100 धावांच्या जवळ नेली. अथित सेठने ही भागीदारी कार्तिकेयच्या गोलंदाजीवर तोडली. त्यानंतर मुलानीने शुभमला विकेटकीपर हेत पटेलकरवी झेलबाद केले. गाझाने प्रियम गर्गला (06) पायचीत बाद केल्यानंतर कर्णधार कर्ण शर्मा (14) विकेटकीपरकडे झेल देत बाद झाला आणि मधल्या फळीने 6 बाद 121 अशी दोन बाद 97 धावा केल्या.






