---Advertisement---

टीम इंडियामध्ये एंट्री करताच ‘या’ खेळाडूने शतकी खेळी करत केला जल्लोष

On: शुक्रवार, सप्टेंबर 16, 2022 8:34 PM
---Advertisement---

न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. या भारत अ संघाचे नेतृत्व संजू सॅमसन याच्याकडे सोपवले आहे. तर या संघामध्ये अनेकांना संधी दिली गेली आहे. त्यातच यामधील एका खेळाडूने संघात जागा मिळताच शतक करत जल्लोष केला आहे. सध्या भारतात प्रथम श्रेणी क्रिकेटचे सामने सुरू आहे. तर कोयम्बतूर येथे दुलीप ट्रॉफी 2022 स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे सामने सुरू आहेत. यामध्ये पृथ्वी शॉ याने नाबाद शतकी खेळी केली आहे.

दूलीप ट्रॉफी 2022च्या पहिला उपांत्य सामना वेस्ट झोन विरुद्ध सेंट्रल झोन यांच्यात सुरू आहे. यामध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) हा वेस्ट झोनकडून खेळत आहे. त्याने सलामीला येताना 96 चेंडूत नाबाद 104 धावा केल्या आहेत. तर कर्णधार अंजिक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने निराशाजनक कामगिरी केली आहे. शॉ याला न्यूझीलंड अ विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारत अ संघात घेतले आहे. या मालिकेतील हे तीन सामने चेन्नई येथे खेळले जाणार आहेत. तर यातील पहिला सामना 22 सप्टेंबरला खेळला जाणार आहे. 27 सप्टेंबर रोजी या मालिकेतील शेवटचा सामना खेळला जाईल.

दुलीप ट्रॉफीमध्ये या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. यामध्ये वेस्ट झोनने दुसऱ्या डावामध्ये 29 षटकामध्ये 3 विकेट्स गमावत 130 धावा केल्या आहेत. यामध्ये शॉने 104 धावा केल्या तर अरमान जाफर 7 धावा करताच बाद झाला. या सामन्याच्या पहिल्या डावात फ्लॉप ठरणारा यशस्वी जायसवाल दुसऱ्या डावातही लवकरच बाद झाला. त्याने फक्त तीनच धावा केल्या. तसेच रहाणे 12 धावा करत बाद झाला.

या सामन्यात सेंट्रलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी प्रथम फलंदाजी करताने वेस्ट झोनने 257 धावा केल्या. त्यामध्ये राहुल त्रिपाठी याने चांगली फलंदाजी केली आहे. त्याने 67 धावा केल्या असून त्यालाही भारत अ संघामध्ये घेतले आहे. तसेच शॉने पहिल्या डावात 60 धावा केल्या. तर सेंट्रल पहिल्या डावात 128 धावांवरच गारद झाला.

भारत अ संघ :
पृथ्वी शॉ, अभिमन्यू ईश्वरन, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, संजू सॅमसन (कर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, शाहबाज अहमद, राहुल चाहर, तिलक वर्मा, कुलदीप सेन, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, नवदीप सैनी, राज अंगद बावा.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या ‘या’ माजी कसोटीपटूंचा जीवनप्रवास उलगडणार मुंबईमध्ये
दोन माजी कर्णधारांच्या करिअरची वाट लावतेय पाकिस्तान टीम! पाहा त्यांचा टी-20 वर्ल्डकपचा संघ
भारताचा अष्टपैलू लाईव्ह सामन्यात गंभीर जखमी, थेट स्टेडियमध्ये आणावी लागली ऍम्ब्युलन्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---