कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या जेपी डुमिनीने काल दक्षिण आफ्रिकेच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठा कारनामा केला. त्याने काल मोमेनटम वनडे कपमध्ये अशी काही फटकेबाजी केली की शेवटच्या ओव्हरमध्ये चक्क ३७ धावा फटकावल्या.
नाइट्स टीमने दिलेल्या २४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केप कोबराज संघाकडून खेळताना ड्युमिनीचा संघ एकवेळ २ बाद २१३ अशा स्थितीत होता आणि त्यांना जिंकायला ४ षटकांत ३२ धावांची गरज होती. परंतु या धावा लवकर केल्या तर त्यांना बोनस गुण मिळणार होता. यावेळी डुमिनी ३० चेंडूत ३४ धावांवर खेळत होता.
अशा वेळी ३६व्या ओव्हरमध्ये एडी ली के या फिरकी गोलंदाजाच्या ओव्हरमध्ये ड्युमिनीने चक्क ३७ धावा केल्या. पहिल्या चार चेंडूत त्याने ४ षटकार खेचले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर २ धावा आणि त्यानंतरच पुढच्या नो बॉलवर चौकार आणि शेवटच्या चेंडूवर षटकार असे त्याने ह्या ३७ (६-६-६-६-२-५nb-६) धावा केल्या.
या संपूर्ण खेळीत त्याने ३७ चेंडूत ७० धावा केल्या.
एका षटकांत ३७ धावा करूनही हा लिस्ट अ मध्ये हा विक्रम ड्युमिनीच्या नावावर झाला नाही कारण एल्टन चिगुम्बुरा या झिम्बाब्वेच्या खेळाडूने ढाका प्रीमियर लीगमध्ये एका षटकात अलाउद्दीन बाबू नावाच्या गोलंदाजाच्या ओव्हरमध्ये ३९ धावा केल्या होत्या.
आजपर्यंत लीस्ट अमध्ये १९ वेळा ३० किंवा त्यापेक्षा अधिक धावा एका षटकात झाल्या आहेत. त्यात ४ वेळा अशी कामगिरी वनडे क्रिकेटमध्ये झाली आहे.
https://twitter.com/CobrasCricket/status/953696384129142784