पुढील वर्षी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने नवी टी२० लीग सुरू करण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी सहा फ्रॅंचाईजी आयपीएलमधीलच संघांनी विकत घेतल्या आहेत. पुढील महिन्यात या लीगसाठी खेळाडूंचा लिलाव आयोजित केला जाईल. तत्पूर्वी, प्रत्येक फ्रॅंचायजीला प्रत्येकी पाच खेळाडू करारबद्ध करण्याची परवानगी देण्यात आली आहे. एमआय केपटाऊन व पार्ल रॉयल्स या संघाने आपल्या खेळाडूंची नावे अधिकृतरित्या घोषित केली आहेत. त्यानंतर आता डर्बन फ्रॅंचायजीनेही आपल्या पाच खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.
या नव्या टी२० लीगमधील डर्बन फ्रॅंचायजी आयपीएलमधील लखनऊ सुपरजायंट्स या संघाचे संघमालक असलेल्या संजीव गोयंका यांनी विकत घेतली आहे. लीगच्या पहिल्या हंगामासाठी फ्रॅंचायजीने दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक, वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर व कायले मायर्स, इंग्लंडचा रिस टोप्ली व दक्षिण आफ्रिकेचा अनकॅप्ड खेळाडू प्रेनेलन सुब्रायन यांना करारबद्ध करण्यात आले आहे. करारबद्ध करण्यात आलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करताना गोयंका म्हणाले,
“आम्ही नव्या लीगसाठी पाच खेळाडूंना करारबद्ध केले आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो. त्यांच्या कौशल्याचा संघाला फायदा होईल. आम्ही एक नवी सुरुवात करण्यास उत्सुक आहोत.”
डी कॉक, होल्डर व मायर्स हे आयपीएलमध्ये लखनऊ सुपरजायंट्स संघाचा भाग आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, डर्बनस्थित फ्रॅंचायजीचे नाव डर्बन सुपरजायंट्स असे असू शकते.
यापूर्वी, मुंबई इंडियन्सच्या मालकीच्या एमआय केपटाऊन संघाने लियाम लिव्हिंगस्टोन, कगिसो रबाडा, सॅम करन, डेवाल्ड ब्रेविस व राशिद खान यांना करारबद्ध करण्यात यश मिळवले आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सच्या मालकीच्या पार्ल रॉयल्सने जोस बटलर, डेव्हिड मिलर, ओबेद मेकॉय व कॉर्बिन बॉश यांना आपल्या संघात सामील करून घेतले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंत कार्तिकच्या जागी ‘या’ खेळाडूला खेळू द्या! माजी दिग्गजानं बीसीसीआयला सुचवलाय नवा पर्याय
कर्णधार म्हणून राहुलपेक्षा वरचढ धवन! आकडेवारीत गाठलयं ‘शिखर’
‘मला आयसीसी स्पर्धांमध्ये खेळायला आवडते!’ स्वत: शिखर धवनने प्रकट केली इच्छा