---Advertisement---

व्हिडिओ: भावाचा झेल घेण्याच्या नादात या क्रिकेटपटूने फोडून घेतले नाक!

On: मंगळवार, नोव्हेंबर 19, 2019 1:06 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या मार्श वनडे कप देशांतर्गत स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत रविवारी साऊथ ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघात सामना झाला. या सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या ऍश्टन एगरला साऊथ ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या त्याच्या भावाचा झेल घेताना मोठी दुखापत झाली आहे.

झाले असे की या सामन्यात साऊथ ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असताना 41 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ऍश्टनचा भाऊ वेस एगरने हवाई फटका खेळला. त्यावर झेल पकडण्यासाठी ऍश्टनने प्रयत्न केला. मात्र त्याच्या हातातून चेंडू घसरला आणि नाकाजवळ लागला. त्यामुळे त्याच्या ऍश्टनखाली पडला आणि त्याच्या नाकातून रक्त येऊ लागले.

त्याला खाली पडलेले पाहून वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे खेळाडू त्याच्या जवळ आले, तसेच त्यांनी लगेचच वैद्यकीय पथकाला बोलावले. त्याचबरोबर ऍश्टन खाली पडलेला पाहून त्याचा भाऊ वेसही लगेचच धावत त्याच्याजवळ आला होता. त्यानंतर ऍश्टन मैदानाबाहेर गेला.

या घटनेचा व्हिडिओ cricket.com.auने ट्विटरवर शेअर केला आहे. 

https://twitter.com/cricketcomau/status/1195988843003928576?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1195988843003928576&ref_url=https%3A%2F%2Fhindi.mykhel.com%2Fcricket%2Fduring-marsh-cup-match-ashton-agar-suffers-gruesome-injury-038696.html

या सामन्यानंतर वेस एगर म्हणाला, “तो घसरला आणि चेंडू त्याच्या चष्मावर आदळला. त्याला पाहून मी खूप गडबडलो होतो. हे सर्व खरोखरच वाईट दिसत होते. मी फक्त त्याच्या तब्येतीची चिंता होतो. त्यामुळे मी कशाचाही विचार न करता खेळपट्टी सोडून त्याच्याकडे धावत गेलो. हे सर्व वाईट होते. पण आभारी आहे की तो ठीक आहे.”

https://twitter.com/Maha_Sports/status/1196679751852650496

https://twitter.com/Maha_Sports/status/1196443299860504576

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---