भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) संघामध्ये बुधवारपासून (16फेब्रुवारी) तीन सामन्याची टी20 मालिका सुरु होत आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ सराव करत आहेl. या मालिकेचा दुसरा आणि तिसरा सामना 18 आणि 20 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. हे तिन्ही सामने कोलकाताच्या ईडन गार्डन ग्राउंडवर खेळाले जाणार आहेत. दरम्यान, मालिकेपूर्वी, मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. पण, या पत्रकार परिषदेत असं काही घडलं की सर्वजण आश्चर्यचकित झाले. कारण क्रिकेटचा विषय सुरु असताना अचानक तिसऱ्या महायुद्धाचा विषय सुरु झाला.
जेव्हा रोहित शर्मा पत्रकार परिषदेत बोलत होता, तेव्हा त्याला अनेक पत्रकार प्रश्न विचारत होते. दरम्यान, एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता, तो उत्तर देत असताना अचानक मागून एक आवाज आला, ‘तिसर्या महायुद्धाचे काउंटडाउन, युक्रेनसाठी २४ तास’. अचानक हा आवाज आला तेव्हा रोहित शर्माही हैराण झाला आणि त्यानंतर तो हसला. या परिषदेत हा आवाज अचानक कोणाच्या तरी माईकमधून आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या वादामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. सर्वत्र त्या वादाचीच चर्चा सुरू आहे.
https://twitter.com/MohitShukla1030/status/1493499954521731073
या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, तो टी२० विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून रणनीतीवर लक्ष केंद्रित करत आहे. यावेळी टी२० सामन्यात रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
भारतीय टी२० संघ
रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवि बिश्नोई, यजुवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा.
वेस्ट इंडीज टी२० संघ
कायरन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबियन ऍलन, डॅरेन ब्राव्हो, रोस्टन चेस, शेल्डन कॉट्रेल, डॉमिनिक ड्रेक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, ब्रँडन किंग, रोवमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, काइल मेयर्स, हेडन वॉल्श.
महत्त्वाच्या बातम्या –
पंजाब किंग्जची साथ सोडणाऱ्या जाफरच्या जागी ‘या’ दिग्गजाची वर्णी, असेल संघाचा नवा फलंदाजी प्रशिक्षक
मूर्ती लहान पण कीर्ती महान! आयपीएल २०२२ चे ५ सर्वात युवा धुरंधर, विश्वविजेत्या कर्णधाराचा समावेश
आता महिला क्रिकेटपटूंवरही बरसणार पैसा; वाचा सविस्तर