---Advertisement---

रिषभ पंतला मोठा फटका! शतक झळकावले तरीही ICC ने केली कारवाई! नेमकं कारण काय?

On: मंगळवार, जून 24, 2025 3:17 PM
---Advertisement---

ICC takes action against Rishabh Pant: भारताचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने हेडिंग्ले येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात शतक शानदार झळकावून इतिहास रचला. मात्र, या शानदार फलंदाजीनंतरही भारताच्या त्याला आयसीसीने फटकारले आहे. पंतने कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल 1 चे उल्लंघन केले होते. यासाठी आयसीसीने त्याला शिक्षाही दिली आहे.

आयसीसीने आपल्या निवेदनात सांगितले की, “रिषभ पंतने खेळाडू आणि सहायक कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.8 नियमांचे उल्लंघन केले आहे. हे आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान पंचाच्या निर्णयावर असहमती दर्शवण्याशी संबंधित आहे.” (ICC Statement)

पंतचा 24 महिन्यांतील हा पहिलाच गुन्हा असल्यामुळे त्याच्या शिस्तभंगाच्या नोंदीमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडण्यात आला आहे. लेव्हल 1 च्या उल्लंघनासाठी किमान दंड अधिकृत फटकार, जास्तीत जास्त दंड खेळाडूच्या मॅच फीच्या 50 टक्के आणि 1 किंवा 2 डिमेरिट पॉइंट जोडणे, अशी तरतूद आहे. मात्र, पंतवर फक्त 1 डिमेरिट पॉइंट जोडला गेला आहे.

इंग्लंडच्या पहिल्या डावात जेव्हा बेन स्टोक्स आणि हॅरी ब्रूक फलंदाजी करत होते, तेव्हा चेंडू बदलण्यावरून उपकर्णधार रिषभ पंत पंचसोबत उभा होता. ही 61व्या षटकातील घटना आहे, त्यावेळी पंचने चेंडूची तपासणी केल्यानंतर तो बदलण्यास नकार दिला, तर पंतला तो पुन्हा तपासला जावा आणि बदलला जावा असे वाटत होते. पंचने नकार दिल्यानंतर पंतने जोरदारपणे चेंडू जमिनीवर फेकून दिला, याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते.

ग्राउंड अंपायर ख्रिस गॅफनी आणि पॉल रीफेल यांच्यासह तिसरे अंपायर शारफुद्दौला इब्ने शाहिद आणि चौथे अंपायर माइक बर्न्स यांनी पंतवर आरोप लावले होते. मात्र, कोणतीही शिस्तभंगाची सुनावणी झाली नाही, कारण पंतने आपला गुन्हा मान्य केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---