fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

लॉकडाउनच्या काळात अभिलाषा म्हात्रे असा घालवत आहेत आपला वेळ…

देशभर करोनामुळे लॉकडाउन झालं आहे. संपुर्ण जगात करोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. करोनामुळे सगळं बंद असताना खेळाडू वेळ घालवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधून काढत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे मनोरंजन व करमणुकीमध्ये वेळ घालवत आहेत. त्यात कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रेही कुठे मागे नाहीत.

अर्जुन पुरस्कार कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे हिने नेटफ्लिक्स वर वेब सिरीज बघताना एक फोटो इंस्टाग्राम स्टोरी मध्ये शेयर केला आहे. मनी हाईस्ट या वेब सिरीजचे नवीन पर्व ३ एप्रिल २०२० पासून सुरुवात झाली. अभिलाषा म्हात्रे यांनी हाईस्ट सुरुवात… अशी स्टोरी टाकली आहे. भारतात या वेब सिरीजचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे म्हात्रे यांना ही बघवीशी वाटली ह्यात आश्चर्य नाही.

मनी हेइस्ट ही स्पॅनिश टेलिव्हिजन वरील वेब सिरीज आहे. हेइस्ट ही गुन्हेगारीवरील ड्रामा सिरीज म्हणून ओळखली जाते. जगभरात ही लोकप्रिय सिरीज आहे. अॅलेक्स पिना यांनी यांची सुरुवात केली आहे. मे २०१७ मध्ये सुरू झालेल्या या वेब सिरीजचे आतापर्यंत ३ सिजन झाले आहेत. ३ एप्रिल २०२० पासून या वेब सिरीजच्या चौथ्या सिजनला सुरुवात झाली आहे.

You might also like