पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका सामन्याला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना रावलपिंडी मैदानावर रंगला आहे. तत्पूर्वी बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि चांगली सुरुवात केली. त्यांनी अवघ्या 16 धावांत 3 पाकिस्तानी खेळाडूंना बाद केलं होतं. कर्णधार शान मसूद (Shan Masood) केवळ 6 धावा करून बाद झाला. त्याच्या विकेटबाबत सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. मसूदच्या विकेटबाबत वाद पाहायला मिळाला.
वास्तविक, मसूद तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. यावेळी तो 11 चेंडूत 6 धावा करून शरीफुल इस्लामच्या चेंडूवर बाद झाला. शरीफुलनं 7व्या षटकातील पाचवा चेंडू टाकला. मसूदला या चेंडूचा बचाव करायचा होता. पण चेंडू त्याच्या पॅड आणि बॅटजवळ जाऊन विकेटच्या मागे गेला. यष्टीरक्षक लिटन दासनं झेल घेऊन अपील केलं. पण अंपायरनं आऊट दिलं नाही. मात्र, संघाचा उत्साह पाहून नजमुलने रिव्ह्यू घेतला. रिप्लेमध्ये चेंडू पॅड आणि बॅटच्या जवळ होता. त्यामुळे स्पाइक दिसून आले. त्यावर त्याला आऊट देण्यात आलं.
Out or not out❓
Shan Masood is dismissed by Shoriful Islam.#PAKvBAN | #TestOnHai pic.twitter.com/8OgkgQKHPa
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 21, 2024
अंपायर रिचर्ड केटलबरो यांनी शान मसूदला मैदानाबाहेर जाण्याचा इशारा दिला. पण मसूद खूप चिडला. काहीतरी बोलून तो मैदानातून निघून गेला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानंही एक्सवर मसूदच्या विकेटचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. व्हिडिओ पाहिल्यास, चेंडू बॅटच्या पुढे जाऊन पॅडवर आदळल्याने स्पाइक दिसले. पण तरीही तिसऱ्या पंचाने त्याला बाद घोषित केले. त्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यामध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. दरम्यान पहिला कसोटी सामना सुरु आहे, तर दुसरा कसोटी सामना (30 ऑगस्ट) रोजी रावलपिंडी मैदनावर रंगणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“पुन्हा एकदा जगातील सर्वोत्तम…” भारतीय संघाबद्दल प्रशिक्षकानं केला मोठा खुलासा
‘संघर्षापासून प्रेमकहाणीपर्यंत’, युवराज सिंगच्या आयुष्यातील हे 5 पैलू दिसणार बायोपिकमध्ये!
मेगा लिलावापूर्वी रोहित-हार्दिकसह मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूंची होणार सुट्टी?