---Advertisement---

“दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है”, मिलरच्या ट्वीटला राजस्थानचा भन्नाट रिप्लाय

David-Miller
---Advertisement---

कोलकाता। मंगळवारी (२४ मे) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील पहिल्या क्वालिफायरचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सने ७ विकेट्सने विजय मिळवत अंतिम सामन्यात स्थान पक्के केले. गुजरातच्या या विजयात डेव्हिड मिलर याचे योगदान महत्त्वाचे ठरले. दरम्यान सामना झाल्यानंतर त्याने केलेले एक ट्विट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. 

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) प्रथम फलंदाजी करताना जोस बटलरच्या ८९ धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरातसमोर १८९ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला अखेरच्या षटकात १६ धावांची गरज होती. यावेळी डेव्हिड मिलरने (David Miller) जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि अखेरच्या षटकातील पहिल्या तिन्ही चेंडूंवर प्रसिद्ध कृष्णाविरुद्ध सलग तीन षटकार ठोकले आणि गुजरातला विजय मिळवून दिला. मिलरने ३८ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६८ धावा केल्या.

मिलरने या खेळीनंतर राजस्थान रॉयल्सची माफीही मागितली आहे. त्यावर राजस्थान रॉयल्सने प्रतिक्रियाही दिली आहे. मिलरने ट्वीट केले आहे की, ‘सॉरी रॉयल फॅमिली.’ त्याच्या या ट्वीटवर राजस्थान रॉयल्सने एक मीम शेअर केले आहे. ज्यावर लिहिले आहे की, ‘दुश्मनही करणार नाही, असे काम मित्राने केले आहे. (दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है.)’

खरंतर राजस्थान रॉयल्स या सामन्यात (Gujarat Titans vs Rajasthan Royals) पराभूत झाला, त्यामुळे आता त्यांना अंतिम सामना खेळायचा असेल, तर त्यांना २७ मे रोजी होणाऱ्या क्वालिफायर दोनच्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. जर राजस्थानने गुजरातला पराभूत केले असते, तर राजस्थान अंतिम सामना खेळला असता.

तसेच मिलर हा २०२० आणि २०२१ सालचा हंगाम राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला आहे. पण आयपीएल २०२२ हंगामापूर्वी त्याला राजस्थान रॉयल्सने मुक्त केले आणि नंतर तो गुजरात लायन्स संघात लिलावादरम्यान सामील झाला. गुजरातकडून मिलरने आयपीएल २०२२ च्या हंगामात १५ सामन्यांत ६४.१४ च्या सरासरीने ४४९ धावा केल्या आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

‘स्वत:ला विराट कोहली समजतोय!’, पहिल्या क्वालिफायरमध्ये आगपाखड करणाऱ्या रियान परागला नेटकऱ्यांनी झापलं

गुजरातचा विजय किती खास? चेन्नईनंतर अशी संधी फक्त आता गुजरातच्या वाट्याला आलीये

‘फ्लाइंग कौर’! हवेत झेपावत हरमनप्रीतने घेतला अप्रतिम झेल; Video भन्नाट व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---