---Advertisement---

BREAKING! दिग्गज क्रिकेटपटूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती, क्रिकेटप्रेमींना धक्का

On: सोमवार, जानेवारी 9, 2023 2:03 PM
Dwaine Pretorius
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ड्वेन प्रिटोरियस याने सोमवारी (9 जानेवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. प्रिटोरियस दक्षिण आफ्रिका संघासाठी कसोटी, वनडे आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला असून संघासाठी त्याचे योगान मोलाचे राहिले आहे.

प्रोटियाज क्रिकेटच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवली गेली. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने पोस्टमध्ये अष्टपैलू ड्वेन प्रिटोरियस आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. “मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठ्या निर्णयांपैकी एक घेतला आहे. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेत आहे,” असे प्रिटोरियने दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला कळवले.

प्रिटोरियस दक्षिण आफ्रिका संघाचे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये प्रतिनिधित्व करत आला होता. त्याने संघासाठी 30 टी-20 आंतरराष्ट्रीय, 27 वनडे आणि तीन कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याच्या नावावर अनुक्रमे 35, 35 आणि 7 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच फलंदाजीच्या रूपात त्याने या फॉरमॅटमध्ये अनुक्रमे 261, 192 आणि 83 धावा केल्या आहेत.  त्याव्यतिरिक्त प्रिटोरियस दक्षिण आफ्रिकेच्या दोन विश्वचषक संघांचेही प्रतिनिधित्व करू शकला आहे.

येत्या काळाता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेतलेला प्रिटोरियस टी-20 फॉरमॅटमध्ये लक्ष केंद्रित करू इच्छितो. अशात जगभरातील वेगवेगळ्या लीगमध्ये चाहत्यांना तो खेळताना दिसेल, अशी अपेक्षा आहे. “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉरमॅटमधील सर्वोत्तम खेळाडू बनण्याचे माझे ध्येय साध्य होईल मदत मिळेल,” असे प्रिटोरियस म्हणाला. (Dwaine Pretorius retired from international cricket)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पॅट कमिन्सला ‘या’ खेळाडूंवर विश्वास, भारत दौऱ्यात ठरणार मॅच विनर्स
दुर्दैवी अपघातात प्रसिद्ध रेसरचे निधन! पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---