---Advertisement---

अत्यंत वेदनादायी…द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन, क्रिकेटविश्वातील शब्दसूर्य मावळला..!

On: गुरूवार, फेब्रुवारी 6, 2025 3:36 PM
---Advertisement---

क्रिकेटविश्वातील एक शब्दसूर्य मावळली आहे. प्रसिद्ध क्रिकेट समालोचक द्वारकानाथ संझगिरी यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 74 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. द्वारकानाथ संझगिरी हे मराठीत क्रिकेटला लोकप्रिय करणाऱ्या थोडक्या लेखकांपैकी एक होते. त्यांची भाषा, शैली आणि क्रिकेटचे किस्से सांगण्याची पद्धत यामुळे त्यांचे लेखन सर्वसामान्य माणसालाही क्रिकेटप्रेमी बनवले. संझगिरी महाराष्ट्रातील आघाडीचे क्रीडा समालोचक आणि क्रिकेट विश्लेषक होते. त्यांच्या क्रिकेटविषयक लेखनशैलीत गंभीर विश्लेषणासोबतच विनोद आणि उपरोधाचे मिश्रण असायचे. द्वारकानाथ संझगिरी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

संझगिरी यांनी सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, विराट कोहली यांसारख्या महान खेळाडूंवर सखोल लेखन केले आहे. मराठीत क्रिकेट लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी स्तंभलेखन, टीव्ही आणि रेडिओवरील समालोचन, आणि प्रवासवर्णनात्मक क्रिकेट लेखन केले. त्यांनी क्रिकेटविषयक “गुलमोहर”, “सचिनायन”, “बॅकफूट प्लेअर” आणि “आयडॉल” असे अनेक प्रसिद्ध पुस्तके लिहली. यासोबतच त्यांनी क्रिकेटशी संबंधित अनेक आंतरराष्ट्रीय सामने कव्हर केले असून, अनेक ऐतिहासिक घटनांवर लेख लिहिले आहेत.

संझगिरी यांचे क्रिकेटविषयक पुस्तके:

सचिनायन – सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीवर आधारित पुस्तक, ज्यात त्याच्या आठवणी, कामगिरी आणि क्रिकेटमधील योगदानाची चर्चा आहे
गुलमोहर – क्रिकेट आणि इतर विविध विषयांवरील लेखसंग्रह
बॅकफूट प्लेअर – क्रिकेटमधील वेगवेगळ्या खेळाडूंच्या शैली, आठवणी आणि किस्से यांचा समावेश
आयडॉल – क्रिकेट आणि खेळाडूंच्या प्रेरणादायी कहाण्यांवर आधारित
स्टेप आऊट – क्रिकेट आणि जीवनातील वेगवेगळ्या पैलूंवर भाष्य करणारे पुस्तक
सर डॉन आणि मी – डॉन ब्रॅडमन यांच्याबद्दलचे त्यांच्या क्रिकेट विचारांवर आधारित पुस्तक

क्रिकेटचा चालता बोलता एनसायक्लोपेडिया द्वारकानाथ संझगिरी यांच्या जाण्याने मराठी साहित्य, पत्रकारिता आणि क्रिकेट विश्लेषणच्या क्षेत्रातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

हेही वाचा-

‘हे’ दिग्गज खेळाडू असणार मुंबईचा भाग, रणजी ट्रॉफीमध्ये हरियाणाविरुद्ध उतरणार मैदानात
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाची डोकेदुखी वाढली, ‘या’ कारणामुळे विराट कोहली प्लेइंग 11 मधून बाहेर
दु:खद बातमी.! लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे 74 व्या वर्षी निधन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---