---Advertisement---

“वी आर चेन्नई बॉईज”, ब्रावो-डू प्लेसिसने सीएसकेच्या आठवणीत गायले खास गाणे, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

On: मंगळवार, सप्टेंबर 7, 2021 2:16 AM
---Advertisement---

सध्या कॅरिबियन प्रीमियर लीग (सीपीएल) सुरु आहे. या स्पर्धेत आतापर्यंत अनेक अशा घटना घडल्या, ज्याला पाहून चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन झाले. असेच पुन्हा एकदा सीपीएलच्या एका सामन्यापूर्वी नाणेफेकी दरम्यान झाले. हा किस्सा ड्वेन ब्रावो आणि फाफ डू प्लेसिस यांच्यात घडला. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे दोघेही इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचे प्रमुख खेळाडू आहेत.

हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून सीएसकेचा भाग आहेत. दोघेही २०११ साली आयपीएलमध्ये सीएसकेमध्ये सामील झाले होते. तेव्हापासून या दोघांनी सोबत खूप क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे यांच्यात चांगली मैत्री देखील तयार झाली आहे. दरम्यान सीपीएलच्या एका सामन्यात नाणेफेक दरम्यान एक मजेशीर किस्सा घडला. फाफ डू प्लेसिस हा सेंट लुसिया किंग्सचा कर्णधार आहे, तर ड्वेन ब्रावो हा सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्स संघाचा कर्णधार आहे.

नाणेफेकी दरम्यान, डू प्लेसिसने नाणे फेकले आणि ड्वेन ब्रावोने नाणेफेक जिंकली. तेव्हा ब्रावोला त्याच्या निर्णयाबाबत विचारले असता, ब्रावोने यावर आश्चर्यकारक असे उत्तर देत गाणे म्हणू लागला. नंतर डू प्लेसिसने देखील त्याची साथ देत गाणे गायले.

या दोघांनीही गायलेले गाणे असे होते, “आम्ही चेन्नईचे बॉईज आहोत, आम्ही जिथे जातो तिथे धिंगाणा घालतो.” यानंतर दोघांचाही हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. सीएसकेने देखील त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये सीएसकेने लिहिले, “सगळीकडे आमचे खेळाडू, आम्ही चेन्नई बॉईज आहोत. जे खूप धिंगाणा करत आहेत.”

https://www.instagram.com/p/CTZ0qnUhiYU/

दरम्यान, नाणेफेक जिंकत ब्रावोने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र ब्रावोचा हा निर्णय चुकला. या सामन्यामध्ये डू प्लेसिसने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन करत एक शतक लगावले. डू प्लेसिसने अत्यंत उत्कृष्ट अशी खेळी केली. ज्याच्या आधारे सेंट लुसिया किंग्सने २० षटकांमध्ये २ गड्यांच्या बदल्यात २२४ धावा केल्या. डू प्लेसिसने २०० च्या स्ट्राइक रेटने केवळ ६० चेंडूत १२० धावा केल्या.

तसेच अष्टपैलू खेळाडू रोस्टन चेसने देखील दमदार खेळ करत ६४ धावा केल्या. ज्यानंतर मिळालेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्स संघ हा सामना पराभूत झाले. त्यांनी केवळ १२४ धावा केल्या, ज्यामुळे सेंट किट्स संघाने हा सामना तब्बल १०० धावांनी गमावला.

महत्त्वाच्या बातम्या –
तीन दिग्गज फलंदाज ज्यांनी आयपीएलमध्ये अनेकदा मोठ्या खेळी केल्या, पण शतक झळकावण्यात आले अपयश
भारतीय गोलंदाजांनी केली कमाल! तब्बल ४ फलंदाजांना क्लीन बोल्ड करत पहिल्यांदाच केला ‘असा’ पराक्रम
जडेजाने इंग्लंडच्या सलामीवीराला बाद करताच कोहलीने हातानं वाजवली पिपाणी, फोटो तुफान व्हायरल

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---