---Advertisement---

इंग्लंड जिंकेल टी२० विश्वचषक, स्टुअर्ट ब्रॉडने व्यक्त केला विश्वास; ड्वेन ब्रावो, मुरली कार्तिकने ‘अशी’ उडवली खिल्ली

On: गुरूवार, जुलै 22, 2021 9:48 AM
---Advertisement---

यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. हे सामने संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि ओमानमध्ये रंगणार आहेत. त्य़ामुळे या विश्वचषकाची चर्चा क्रिकेट जगतात सुरु झाली आहे. नुकतेच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने या विश्वचषकाबद्दल आपले मत व्यक्त केले होते, ज्याची वेस्ट इंडिजच्या अष्टपैलू खेळाडूने खिल्ली उडवली आहे.

नुकताच इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात टी -२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत इंग्लंड संघाने पाकिस्तान संघावर २-१ ने विजय मिळवला होता. ही टी-२० मालिका सुरू असताना, स्काय स्पोर्ट्सवर समालोचन करत असलेल्या स्टुअर्ट ब्रॉडने म्हटले होते की, “मी आता ओएन मॉर्गनला ट्रॉफी उचलताना पाहत होतो. मला असे वाटते की,आम्ही टी२० विश्वचषक स्पर्धा जिंकणार आहोत. आम्ही बऱ्याच गोष्टींमध्ये सुधारणा केली आहे.आमच्या संघातील फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये खूप सखोलता आहे. आम्ही निडर होऊन क्रिकेट खेळत आहोत. मला तर वाटत आहे की, आम्ही विश्वचषक स्पर्धा जिंकणार.”

ब्रावोने उडविली खिल्ली
स्टुअर्ट ब्रॉडच्या या भविष्यवाणीची खिल्ली भारत आणि विंडीजच्या खेळाडूंनी उडवली. ब्रॉडची प्रतिक्रिया इएसपीएन क्रिकइन्फोच्या इस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आली होती. त्या पोस्टवर वेस्ट इंडिज संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो याने जोरदार प्रत्युत्तर देत लिहिले की,”स्टुअर्ट ब्रॉड आता कॉमेडियन झाला आहे, हे मला माहित नव्हते. सर्व संघांना शुभेच्छा आणि काय होते ते पाहूया.”

वेस्ट इंडिज संघाने आत्तापर्यंत सर्वाधिक २ वेळेस टी -२० विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. तसेच नुकताच ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेत वेस्ट इंडिज संघाने ४-१ ने विजय मिळवला होता.

https://www.instagram.com/p/CRkKc1vI7yD/

मुरली कार्तिकनेही दिली आपली प्रतिक्रिया
भारतीय संघाचा माजी फिरकीपटू मुरली कार्तिक याने देखील स्टुअर्ट ब्रॉडच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याने लिहिले की,” इंग्लंड प्रत्येकवेळी ट्रॉफी आपल्याच घरी येणार, असे म्हणून स्वतःच आपल्या संघावर दुर्दैव ओढावून घेत आहे, जेव्हा की त्यांच्यापासून ट्रॉफी अजून खूप दूर आहे.”

खरंतर नुकत्याच झालेल्या युरो कप २०२० फुटबॉल स्पर्धेतही इंग्लंड संघाला विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यावेळीही सर्वत्र ट्रॉफी आपल्याचकडे येणार, असे सूर इंग्लंडमधून ऐकू येत होते. पण अंतिम सामन्यात इंग्लंडला इटलीविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आणि इंग्लंडचे स्वप्न भंगले. त्याच गोष्टीचा दाखला देत कार्तिकने ब्रॉडची खिल्ली उडवली आहे.

Screengrab: Instagram/espncricinfo

युएईमध्ये होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. टी२० विश्वचषकाला १७ ऑक्टोबर रोजी सुरुवात होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

धोनीसाठी जिंकायची आहे चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफी, सुरेश रैनाने केले मन जिंकणारे वक्तव्य

“विजय मिळवणेच श्रीलंका संघ विसरुन गेला आहे”, दिग्गज क्रिकेटरकडून आपल्याच देशाच्या संघाला घरचा आहेर

कोलंबोतील अविश्वसनीय विजयानंतर भुवनेश्वरने धोनीबरोबर केलेल्या ‘त्या’ भागीदारीच्या आठवणींना दिला उजाळा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---