---Advertisement---

डीजे ब्राव्हो गाणे पुन्हा वाजले, परंतू यावेळी कारण होते वेगळे

On: गुरूवार, ऑगस्ट 6, 2020 11:01 AM
---Advertisement---

मुंबई । वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने केवळ खेळातच नव्हे तर आपल्या गाण्यांद्वारेही एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  2016 मध्ये जेव्हा वेस्ट इंडीज टी 20 विश्वचषक जिंकला तेव्हा ब्राव्होचे ‘चॅम्पियन’ हे गाणे त्यावेळी चांगलेच वाजले होते. या गाण्यानंतर ब्राव्होने कित्येक गाणी रिलीज केली, पण त्याने पुन्हा हे गाणे गायले आहे. तेही त्याच्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी.

4 ऑगस्ट रोजी तिची मुलगी ड्वेनेस ब्राव्हो 16 वर्षांची झाली आहे. वाढदिवसादिवशी मोठी पार्टी केली होती. आपल्या मुलीच्या वाढदिवशी ब्राव्होने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये, ब्राव्हो आपली मुलगी आणि पत्नीबरोबर आपल्या मुलीसाठी गाणी गाताना दिसतो. यावेळी त्यांची मुलगीही गाणं म्हणत साथ देत आहे. व्हिडिओ शेअर करताना ब्राव्होने लिहिले, “देवाचे आभार मानतो की मी माझ्या सुंदर मुलीला तिच्या 16 व्या वाढदिवशी सर्वकाही देऊ शकलो. तिच्या सर्व मित्रांना आणि तिच्या आईला पार्टी आयोजीत केल्याबद्दल धन्यवाद!”

https://www.instagram.com/p/CDcsZZhn4Y-/

ब्राव्हो 18 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे होणार्‍या कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये सीपीएलमध्ये खेळणार आहे. या स्पर्धेत यात परदेशी आणि कॅरिबियन खेळाडूंचा समावेश आहे. ब्राव्हो सीपीएल 2020 मध्ये त्रिनबागोनाइट रायडर्सकडून खेळणार आहे, ज्याचे नेतृत्व कायरन पोलार्ड करत आहे. त्यांनंतर ब्राव्हो 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत युएईमध्ये आयपीएलच्या 13 व्या मोसमात ही सीएसकेकडून खेळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---