---Advertisement---

पंजाब विरुद्धच्या सामन्याआधी चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का…

On: शुक्रवार, एप्रिल 5, 2019 7:38 PM
---Advertisement---

शनिवारी(6 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्जचा आयपीएल 2019 मधील पाचवा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध होणार आहे. पण या सामन्याआधीच चेन्नईला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्यामुळे तो पंजाबविरुद्धचा सामना न खेळण्याची दाट शक्यता आहे.

3 एप्रिलला मुंबई विरुद्ध झालेल्या सामन्यानंतर ब्रावोच्या दुखापतीबद्दल धोनीने माहिती दिली आहे.

तो म्हणाला, ‘ब्रावोला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. आमच्याकडे खूप खेळाडू नाही. काहींना आधीच दुखापत झाली आहे. डेव्हिड विली त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे या मोसमासाठी उपलब्ध नाही. लुंगी एन्गिडीसुद्धा दुखापतीमुळे आमच्याबरोबर नाही. त्यामुळे आम्ही आधी खेळपट्टी बघू आणि मग संघात कोणाला संधी द्यायची याचा निर्णय घेऊ.’

या मोसमातून चेन्नईचे विली आणि एन्गिडी आधीच बाहेर पडले होते. पण ब्रावोही दुखापतग्रस्त असल्याने चेन्नईसमोर मोठी समस्या उभी राहिली. कारण ब्रावो हा चेन्नईचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याच्या गोलंदाजीबरोबरच त्याची आक्रमक फलंदाजीही चेन्नईसाठी फायदेशीर आहे.

ब्रावोने चेन्नईकडून या मोसमातील पहिले चारही सामने खेळले आहेत. त्याने पहिल्या तीन सामन्यात चांगली कामगिरीही केली. पण मुंबई विरुद्धच्या सामन्यात त्याला विशेष काही करता आले आहे. मुंबई विरुद्धच्या सामन्यात 20 व्या षटकात ब्रावोच्या गोलंदाजीवर मुंबईच्या किरॉन पोलार्ड आणि हार्दिक पंड्याने 29 धावा काढल्या होत्या.

तसेच ब्रावोने फलंदाजी करतानाही फक्त 8 धावाच केल्या. या सामन्यात चेन्नईला 37 धावांनी पराभव स्विकारावा लागला. हा चेन्नईचा या मोसमातील पहिलाच पराभव होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

तेव्हा होता चाहता आता झाला थेट ख्रिस गेलचा संघसहकारी…

विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाने घोषीत केला या संभाव्य खेळाडूंचा संघ

धोनीच्या समोरच हार्दिक पंड्याने मारला हॅलिकॉप्टर शॉट, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment