---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी…

On: शनिवार, एप्रिल 6, 2019 2:47 PM
---Advertisement---
आज(6 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्जचा आयपीएल 2019 मधील पाचवा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध होणार आहे. पण या सामन्याआधीच चेन्नईला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला पुढील दोन आठवड्यांसाठी चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यांना मुकावे लागणार आहे.

याबद्दल चेन्नई सुपर किंग्सचे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसीने माहीती दिली आहे. ‘मी ब्रावोला ग्रेड 1 ची हॅमस्ट्रिंगची दुखापत झाले असल्याचे स्पष्ट करत आहे. यामुळे तो दोन आठवड्यांसाठी आयपीएलमधून बाहेर पडणार आहे. आमच्या संघासाठी हे मोठे नुकसान आहे. त्याचे संघात असल्याने चांगला समतोल राखला जातो. तो शानदार खेळाडू आहे.

पण त्याच्या अनुपस्थितीमुळे संघात थोडा बदल होईल. पण मला खात्री आहे आम्ही अद्याप एक मजबूत संघ ठेवण्यास सक्षम आहोत. आमच्यासाठी जरी हा मोठा धक्का असला तरी याआधीही आम्ही आशा आव्हानांचा सामना केला आहे आणि त्यातून बाहेर पडलो आहे. त्यामुळे आशा आहे आम्ही यातून बाहेर येऊ.’

या मोसमातून चेन्नईचे डेव्हिड विली आणि लुंगी एन्गिडी आधीच बाहेर पडले होते. पण ब्रावोही दुखापतग्रस्त असल्याने चेन्नईसमोर मोठी समस्या उभी राहिली. कारण ब्रावो हा चेन्नईचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याच्या गोलंदाजीबरोबरच त्याची आक्रमक फलंदाजीही चेन्नईसाठी फायदेशीर आहे. पण आता या समस्येतून चेन्नई कशी बाहेर पडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

२०१९ विश्वचषकासाठी अफगाणिस्तान संघाने घोषीत केला या संभाव्य खेळाडूंचा संघ

ऑस्ट्रेलियाच्या या माजी क्रिकेटपटूने वेष बदलून केली चेन्नईच्या मार्केटमध्ये खरेदी, पहा व्हिडिओ

पंजाब विरुद्धच्या सामन्याआधी चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment