कॅरेबियन प्रीमियर लीगचा पाचवा सामना गयाना अमेझॉन वॉरियर्स आणि सेंट किट्स एंड नेविस पॅट्रियट्स यांच्यात पार पडला आहे. यात गयानाचा संघ निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 146 धावा करू शकला. प्रत्युत्तरात सेंट किट्स संघाने 7 चेंडू शिल्लक असताना केवळ 2 गडी गमावून लक्ष्य साध्य केले आणि 8 विकेट्सने सामना जिंकला. तथापि, गयानाच्या डावादरम्यान हृदय जिंकणारे दृश्यही पाहायला मिळाले.
ही घटना गयानाच्या डावाच्या शेवटच्या षटकात घडली. जेव्हा मोहम्मद हाफिज नॉन स्ट्रायकरवर उभा होता आणि ड्वेन ब्राव्हो गोलंदाजी करत होता. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हाफिज क्रीज सोडून धाव घेण्यासाठी थोडा पुढे गेला होता आणि हे ब्राव्होने पाहिले. ब्राव्होने आपला रनअप घेतल्यावर चेंडू टाकलाच नाही. पण त्याने मंकडिंग पद्धतीने त्यास बादही केले नाही. त्याने क्रीजच्या थोडे पुढे गेल्यावर हाफिजला मिठी मारली आणि क्रिकेट हा अजूनही सज्जनांचा खेळ आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे आणि चाहत्यांनाही ब्राव्होची विरोधी संघातील खेळाडूप्रती असलेली मनोधारणा खूप आवडत आहे.
Definition of great sportsmanship 🏏 @DJBravo47 @MHafeez22 @sknpatriots @GYAmazonWarrior #GAWvSKNP #CPL21 #CricketPlayedLouder #BiggestPartyInSport pic.twitter.com/4XI4zBeGS0
— CPL T20 (@CPL) August 28, 2021
मंकडिंग पद्धतीने बाद करणे योग्य की अयोग्य? यावर बरेच मतप्रवाह आहेत. भारतीय फिरकीपटू आर अश्विनने याआधी बऱ्याचवेळी फलंदाजांना मंकडिंग पद्धतीने बाद करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे बऱ्याचदा वाद उफाळून वर आले आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यरने खुलासा केला होता की, त्याने अश्विनला आयपीएलमध्ये मंकडिग पद्धतीने फलंदाजास बाद न करण्यास राजी केले आहे.
2020 च्या आयपीएल दरम्यान, अश्विनने राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला मंकडिंग पद्धतीने बाद केले. अश्विन आता आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या हारकिरीस कमजोर फलंदाजी जबाबदार, दिग्गजाने चौथ्या कसोटीसाठी सुचवला ‘या’ धुरंधराचा पर्याय
इंग्लंडच्या भेदकतेपुढे भारताची भंबेरी! विराटच्या ‘या’ निर्णयांनी हुकवली सलग दुसऱ्या विजयाची संधी
लीड्स कसोटीनंतर इंग्लंडची सलग दुसऱ्या विजयाची तयारी, ‘या’ धुरंधराला देणार संधी!