इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी (8 एप्रिल) दुसरा सामना वाजता वानखेडे स्टेडिअम येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला गेला. घरच्या मैदानावर खेळत असलेल्या मुंबईला या सामन्यात सुरुवात चांगली मिळाली. मात्र, त्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी पुनरागमन केले. मुंबईच्या क्षेत्ररक्षकांनी त्यांना योग्य साथ दिली. त्यावेळी ऋतुराज गायकवाड व ड्वेन प्रिटोरियस यांनी एकत्रितपणे झेल टिपत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Team work at its best 🙌🏻
Dwaine Pretorius and Ruturaj Gaikwad combine to dismiss Tristan Stubbs 👌🏻👌🏻
WATCH 🔽 #TATAIPL | #MIvCSK pic.twitter.com/Jz3aqLK8yn
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2023
रोहित शर्मा व ईशान किशन यांनी मुंबईला चांगली सुरुवात दिल्यानंतर त्यांचा डाव गडगडला. रवींद्र जडेजा व मिचेल सॅंटनर या दोन्ही डावखुऱ्या फिरकीपटूंनी मुंबईचे पाच फलंदाज बाद केले. चेन्नईच्या गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांनी देखील तशीच साथ दिली. चेन्नईच्या क्षेत्रक्षकांनी या सामन्यात चार जबरदस्त झेल टिपले.
हंगामातील पहिला सामना खेळण्यासाठी मुंबईचा ट्रिस्टन स्टब्स उतरला होता. मात्र, त्याला आपली चमक दाखवत आली नाही. 10 चेंडूंवर केवळ पाच धावा करत तो बाद झाला. मात्र, त्याला बाद करताना ड्वेन प्रिटोरियस व ऋतुराज गायकवाड यांनी एक नेत्रदीपक झेल पूर्ण केला. आपले आयपीएल पदार्पण करत असलेल्या सिसांडा मगाला याला षटकार मारण्याच्या प्रयत्नात स्टब्सने समोरच्या दिशेने चेंडू मारला.
त्यावेळी तिथे क्षेत्रक्षण करत असलेल्या प्रिटोरियसने तो चेंडू टिपला. मात्र, आपण सीमारेषेपार जात आहोत असे लक्षात येताच त्याने तो चेंडू हवेत उडवला. त्यानंतर लॉंग ऑनवरून धावत आलेल्या ऋतुराज गायकवाड यांनी सहजतेने झेल पूर्ण करत मुंबईला धक्का दिला. या व्यतिरिक्त रविंद्र जडेजा, एमएस धोनी व अजिंक्य रहाणे यांनी देखील उत्कृष्ट झेल टिपले.
(Dwayne Pretorius And Ruturaj Gaikwad Tookd Stunning Relay Catch IPL 2023 MIvCSK)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई वि. चेन्नई : धोनीने पहिली बाजी जिंकली, नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग इलेव्हन
रत्नागिरी अरावली ॲरोज संघाने रोखला परभणी संघाचा विजयीरथ