18 ऑगस्टपासून जकार्ता येथे 18 वी आशियाई क्रीडा स्पर्धा सुरु होणार आहे.
गत आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता भारतीय हॉकी संघ आपले विजेतेपद कायम राखण्यास उत्सुक आहे. असे मत भारताचा ड्रॅग फ्लिकर सुपिंदर पाल सिंगने व्यक्त केले आहे.
“राष्ट्रकुल स्पर्धेत रजत पदक विजेत्या न्युझीलंड संघाविरुद्ध खेळणे महत्त्वाचे आणि आव्हानात्मक होते. न्युझीलंड विरुद्धची हि मालिका शियाई क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाची होती. यामध्ये आम्ही केलेल्या चांगल्या कामगिरीचा नक्कीच फायदा होईल. तसेच भारतीय संघ शियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्ण पदक कायम राखण्यास उत्सुक आहे.” असे रुपिंदर पाल सिंग म्हणाला.
भारतीय हॉकी संघाने रविवारी (22 जुलै) तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील, तिसऱ्या सामन्यात न्युझीलंडवर ४-0 ने विजय मिळवला.
या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्युझीलंडवर 3-0 ने विजय मिळवला.
188 सामन्यात 82 गोल करणाऱ्या रुपिंदरची कामगिरी आशियाई क्रिडा स्पर्धेत भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-रोहीत शर्माच्या पत्नीचे युजवेंद्र चहलला सडेतोड उत्तर
-भारतीय क्रिकेट इतिहासात असे दुसऱ्यांदा घडले