---Advertisement---

MPL 2025 आधी ईगल नाशिक टायटन्सची निराळी चाल, तीन दिवसात बदलणार खेळ?

On: गुरूवार, मे 29, 2025 7:36 PM
---Advertisement---

एमपीएल 2025 सुरू होण्यासाठी अवघ्या सहा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यापूर्वी सर्वच संघ विजेतेपदासाठी कंबर कसलेले दिसून येतात. दुसऱ्या हंगामातील उपविजेता ईगल नाशिक टायटन्स (Eagle Nashik Titans) यांची तयारी देखील अंतिम टप्प्यात आलेली दिसते. आपल्या तयारीचा अखेरचा भाग म्हणून‌ त्यांनी एका खास तीनदिवसीय सराव शिबिराचे आयोजन केले आहे.

एमपीएल 2023 सोबतच मुंबई क्रिकेट असोसिएशनची मुंबई टी20 लीग देखील खेळली जाणार आहे. ही स्पर्धा मुंबईत पार पडेल. या स्पर्धेत ईगल ठाणे स्ट्रायकर्स हा संघ सहभागी होत आहे. ईगल ठाणे स्ट्रायकर्स व ईगल नाशिक टायटन्स या दोन्ही संघांची मालकी ईगल इन्फ्रा यांच्याकडे असलेली दिसते. त्यामुळे आपापल्या लीग पूर्वी दोन्ही संघ एकत्र सराव करताना दिसतील. हे सराव शिबिर मुंबईत होण्याची शक्यता आहे.

नाशिक व ठाणे हे दोन्ही संघ 30 मे, 31 मे व 1 जून अशा तीन दिवशी सोबत सराव करतील. त्यानंतर या संघांदरम्यान सराव सामना देखील खेळला जाईल.‌ ईगल ठाणे स्ट्रायकर्स संघात अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये भारतीय संघाचा अष्टपैलू शार्दुल ठाकूर, ‌अथर्व अंकोलेकर‌ व साईराज पाटील ‌यांच्यासारखे तगडे खेळाडू आहेत.

दुसऱ्या बाजूला नाशिक संघात कर्णधार प्रशांत सोळंकी, मुकेश चौधरी, अर्शिन कुलकर्णी आणि दिग्विजय देशमुख यांच्याकडे आयपीएल खेळण्याचा अनुभव आहे.‌ या खेळाडूंव्यतिरिक्त अथर्व काळे, रंजीत निकम व मंदार भंडारी हे खेळाडू संघाला मजबूत बनवतात. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू व अनुभवी प्रशिक्षक साईराज बहुतुले हे नाशिक संघाचे मेंटर आहेत. तर, महाराष्ट्राचा माजी वेगवान गोलंदाज समद फल्लाह संघाचा मुख्य प्रशिक्षक असेल. नाशिक 4 जून रोजी उद्घाटनाचा सामना खेळताना दिसेल.

एमपीएल 2025 साठी ईगल नाशिक टायटन्स संघ – प्रशांत सोळंकी (कर्णधार), मुकेश चौधरी, मंदार भंडारी, अर्शिन कुलकर्णी, अथर्व काळे, रणजीत निकम, अक्षय वायकर, कौशल तांबे, दिग्विजय देशमुख, साहिल पारेख, सिध्दांत दोशी, रेहान खान, हरी सावंत, रझाक फल्लाह, योगेश डोंगरे, मनोज इंगळे, रोहन दामले, पृथ्वीराज कंद, बालकृष्ण काशिद, आदर्श मणुरे, सुश्रुत सावंत

पहिल्या दोन हंगामाप्रमाणे एमपीएल 2025 ही पुण्यातील एमसीए इंटरनॅशनल स्टेडियम, गहुंजे येथे खेळवली जाणार आहेत. यासंदर्भात एमसीए अध्यक्ष आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेडियममध्ये येणाऱ्या सर्व प्रेक्षकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. तसेच, ज्यांना स्टेडियममध्ये जाता येणार नाही, त्यांच्यासाठी MPL 2025 मधील सर्व सामने ‘JioHotstar’ या OTT अ‍ॅपवर तसेच ‘Star Sports 2’ वाहिनीवर थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत. (MPL 2025 Live on Star Sports 2 and JioHotstar

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---