भारतीय क्रिकेटच्या देशांतर्गत हंगामाला लवकरच सुरूवात होत आहे. दुसरी सर्वात मानाची प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धा दुलीप ट्रॉफीने हा हंगाम सुरू होईल. पुन्हा एकदा विभागीय पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेसाठी पूर्व विभागाने आपला संघ जाहीर केला. बंगालचा अनुभवी फलंदाज तसेच क्रीडामंत्री मनोज तिवारी याच्याकडे संघाचे नेतृत्व दिले गेले असून, नुकतीच भारतीय संघात निवड झालेला अष्टपैलू शाहबाज अहमद यालाही संघात स्थान दिले गेले आहे.
पूर्व विभागाच्या संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत. रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहचलेल्या बंगालच्या सात खेळाडूंना संधी मिळाली आहे. झारखंडचा विराट सिंग हा संघाचा उपकर्णधार असेल. आयपीएल गाजवलेला आसामचा रियान पराग संघाचा भाग आहे.
सप्टेंबर महिन्यात भारतीय क्रिकेटच्या नव्या हंगामाला सुरुवात होतेय. ८ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या काळात दुलीप ट्रॉफी खेळली जाईल. साखळी फेरीचे सामने चेन्नई येथे खेळले जातील. तर, अंतिम सामन्याचे यजमानपद कोइंबतूर भूषवेल. स्पर्धेत उत्तर, पश्चिम, पूर्व, दक्षिण, मध्य या आधीच्या संघासह ईशान्य भारतातील संघही सामील होईल.
दुलीप ट्रॉफीसाठी पूर्व विभागाचा संघ-
मनोज तिवारी (कर्णधार), कुमार घरामी, अनुस्तूप मुजूमदार, अभिषेक पोरेल, इशान पोरेल, आकाश दीप, शाहबाज अहमद (सर्व बंगाल), विराट सिंह (उपकर्णधार), नाजिम सिद्दकी, कुमार कुशाग्र, शाहबाज नदीम (सर्व झारखंड), शंतनु मिश्रा (ओडीसा), रियान पराग (आसाम), मुख्तार हुसैन (अरूणाचल प्रदेश), मनी शंकर मुरा सिंह (त्रिपुरा)
स्टॅंडबाय- अभिजीत साकेत (बिहार), राजेश मोहंती (ओडिशा), अनुकूल रॉय (झारखंड), सायन मोंडल (बंगाल)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शत्रू नव्हे प्रतिस्पर्धी! विराटच्या पुनरागमनासाठी आफ्रिदी करतोय प्रार्थना, व्हिडिओ जिंकेल मन
पाकिस्तानला दुखापतींचे ग्रहण, आफ्रिदीनंतर ‘हा’ वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल
रोहित, लक्ष्मणसमोर मोठा प्रश्न! पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी हुड्डा आणि कार्तिक पैकी कोण होणार इन?