रविवारी (२५ जुलै) भारत विरुद्ध श्रीलंका या संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ३८ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने टी-२० मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. तसेच हा सामना झाल्यानंतर कर्णधार शिखर धवनने युवा फलंदाज सूर्यकुमार यादव आणि संघाचा उप कर्णधार भुवनेश्वर कुमार याचे तोंडभरून कौतुक केले आहे.
या सामन्यात सूर्यकुमार यादवने चौफेर फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले होते. तर भुवनेश्वर कुमार याने अप्रतिम गोलंदाजी करत श्रीलंका संघातील ४ फलंदाजांना माघारी पाठवले होते.
या खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक करताना शिखर धवन म्हणाला, “सूर्यकुमार यादव एक उत्कृष्ट खेळाडू आहे. आम्हाला त्याला फलंदाजी करताना पाहायला खूप आवडतं. इतकेच नव्हे तर या सामन्यात त्याने माझ्या डोक्यावरचा भार हलका केला होता. तसेच त्याला कुठला शॉट केव्हा खेळायचा आहे. याचे तो व्यवस्थित नियोजन करतो आणि योग्य वेळीच तो शॉट खेळतो. जे खरच कौतुकास्पद आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “या सामन्यात आम्हाला ठाऊक होते की, फिरकी गोलंदाज चांगली गोलंदाजी करणार. तसेच भुवनेश्वर कुमारने देखील अप्रतिम गोलंदाजी केली. या संपूर्ण सामन्यात आमच्या संघाने एकजूट होऊन लढा दिला. आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या वरून चक्रवर्तीने देखील या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.” (Easy win for india against srilanka, Shikhar Dhawan credits suryakumar yadav, Bhuvaneshwar kumar and varun Chakravarthy)
या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. तसेच शिखर धवनने ४६ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २० षटक अखेर १६४ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघाकडून चरिथ असलंकाने ४४ आणि अविष्का फर्नांडोने २६ धावांची खेळी केली. तसेच भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ४ गडी बाद केले. श्रीलंका संघाचा डाव १८.३ षटकात १२६ धावांवर संपुष्टात आला होता. हा सामना भारतीय संघाने ३८ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
भुवीने उद्ध्वस्त केला श्रीलंकेचा डाव, ४ विकेट्स घेत ‘ही’ अतुलनीय कामगिरी करणारा ठरला केवळ दुसराच
एक ही तो दिल है, कितनी बार जितोगे! हार्दिकने विरोधी संघाच्या फलंदाजाला भेट दिली स्वत:ची बॅट
Video: चमिराची चपळ गोलंदाजी; पहिलाच चेंडू असा टाकला की, शॉ भोपळाही न फोडता झेलबाद