---Advertisement---

Video: चमिराची चपळ गोलंदाजी; पहिलाच चेंडू असा टाकला की, शॉ भोपळाही न फोडता झेलबाद

---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला होता. आता या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेचा थरार पाहायला मिळत आहे. या मालिकेतील पहिला टी-२० सामना रविवारी (२५ जुलै) प्रेमदासा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ३८ धावांनी विजय मिळवला. परंतु, आपला पहिलाच सामना खेळत असलेला पृथ्वी शॉ गोल्डन डकवर बाद झाला आहे.

या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करण्यासाठी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांची जोडी मैदानात आली होती. या सामन्यातून पृथ्वी शॉने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वनडे मालिकेदरम्यान तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आला आहे. त्यामुळे अशी आशा व्यक्त केली गेली होती की, तो मोठी खेळी खेळणार.

परंतु डावातील पहिल्याच चेंडूवर तो माघारी परतला. दशुमंता चमिराने अप्रतिम स्विंग होणारा चेंडू टाकला जो पृथ्वी शॉला कळालाच नाही आणि तो यष्टिरक्षक मिनोद भानुकाच्या हातून झेलबाद झाला. (Prithvi shaw dream debut gone on duck on his first T20I match against srilanka)

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ५ गडी बाद १६४ धावा केल्या होत्या. यामध्ये सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ५० धावांचे योगदान दिले होते. तर कर्णधार शिखर धवनने ४६ आणि संजू सॅमसनने २७ धावांची खेळी केली. श्रीलंका संघाकडून गोलंदाजी करताना चमिरा आणि हसरंगा यांना प्रत्येकी २-२ गडी बाद करण्यात यश आले.

भारतीय संघाने दिलेल्या १६५ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघाकडून असलंकाने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. अविष्का फर्नांडोने २६ धावांचे योगदान दिले. भारतीय संघांकडून उपकर्णधार भुवनेश्वर कुमारने अप्रतिम गोलंदाजी करत श्रीलंकेच्या ४ फलंदाजांना माघारी पाठवले. श्रीलंका संघाचा डाव १८.३ षटकात १२६ धावांवर संपुष्टात आला होता. या सामन्यात भारतीय संघाने ३८ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

श्रीलंका वि. भारत: ४६ धावांची खेळी करत ‘कर्णधार’ धवन ‘या’ यादीमध्ये सेहवागला पछाडत आला पहिल्या स्थानी

पदार्पणाच्या टी२० सामन्यात शुन्यावर बाद होऊनही पृथ्वी शॉच्या नावावर ‘मोठे’ विक्रम; रोहितलाही पछाडल

श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक करताच सूर्यकुमार यादवच्या नावावर झाला ‘मोठा’ विक्रम; गंभीर, रैनाही पडले मागे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---