इंग्लंड आणि भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना हेडिंग्ले येथे खेळला गेला. या सामन्यात यजमान इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीतील पराभवाचे उट्टे काढत भारतीय संघाचा एक डाव व ७६ धावांनी पराभव केला. मात्र, या सामन्यादरम्यान भारतीय खेळाडू आणि इंग्लिश खेळाडू यांच्या हेल्मेट व टोप्यांबाबत वेगळीच चर्चा सुरू होती.
विराटने टोपी घालून केली फलंदाजी
लीड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशीच्या शेवटच्या १० षटकांत इंग्लंडने विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराविरुद्ध आपले फिरकी गोलंदाज गोलंदाजीसाठी पाचारण केले. कारण, पंचांनी खराब प्रकाशामुळे वेगवान गोलंदाजांना गोलंदाजी करण्याची परवानगी दिली नाही. इंग्लंडचा कर्णधार जो रूटनेही यासाठी सहमती दर्शवली. त्यानंतर विराट कोहलीने हेल्मेट काढून टोपी घातली आणि सहज धावा काढण्यास सुरुवात केली.
रूटने फिरकीपटूंविरुद्ध आपले हेल्मेट काढले नाही
याबाबतची मनोरंजक गोष्ट अशी आहे की, जेव्हा इंग्लंडच्या फलंदाजांसमोर भारताचे फिरकी गोलंदाज गोलंदाजीसमोर येतात तेव्हा त्यांचे फलंदाज कधीही हेल्मेट काढलेले दिसत नाहीत. भारत दौऱ्यावेळी चेन्नई कसोटीत इंग्लंडचा कर्णधार जो रूटने द्विशतक ठोकले होते. मात्र, त्याने फिरकीपटूंच्या विरोधात एकदाही टोपी घातली नाही. अनेकांनी याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.
To answer the question why kohli can bat in a cap but England players aren’t allowed to….. the ecb head protection regs state that anyone playing professional or pathway cricket must wear a helmet to bat in. Even against a spinner.
— Elizabeth Ammon (@legsidelizzy) August 27, 2021
…म्हणून इंग्लंडचे फलंदाज फलंदाजी करताना टोपी घालत नाही
इंग्लंडमधील जेष्ठ क्रीडा पत्रकार एलिझाबेथ अॅमॉन यांनी याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले,
‘कोहली टोपी घालून फलंदाजी करू शकतो. मात्र, इंग्लिश खेळाडूंना याची परवानगी नाही. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ईसीबी) नियमानुसार, कोणत्याही फलंदाजाला व्यावसायिक किंवा इतर प्रकारच्या क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना हेल्मेट घालणे अनिवार्य आहे. समोर फिरकीपटू असला तरी, हेल्मेट उतरवले नाही पाहिजे.’
हे आहे कारण
या नियमाद्वारे फलंदाजाची सुरक्षा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जेणेकरून फलंदाजी करताना चेंडू डोक्याला लागायला नको. फिरकी गोलंदाज गोलंदाजी करत असला तरी, क्षेत्ररक्षकाने चेंडू थ्रो केल्यास तो फलंदाजाला लागू शकतो. हेच कारण आहे की, ईसीबी कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ इच्छित नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
चेतेश्वर पुजाराचा तो शॉट पाहून अंपायरही घाबरले, भीतीपोटी असं वाचवलं स्वत:ला, पाहा व्हिडिओ
तिसऱ्या कसोटीनंतर उभय कर्णधारांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया, विराट म्हणाला…





