---Advertisement---

कोहलीला ट्रोल करणे या देशाला पडले भलतेच महागात, चाहत्यांनी…

On: रविवार, मे 10, 2020 4:25 PM
---Advertisement---

आपणा सर्वांना माहित आहे की, सध्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे अनेक क्रिकेट बोर्ड आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

अशामध्ये इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) नुकतेच आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) एक व्हिडीओ शेअर करत त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे हे ट्वीट इंग्लंड क्रिकेट बोर्डाला महागात पडले असून आता भारतीय चाहत्यांनीच त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

खरंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने २०१८मधील एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये दिसते की, विराट फलंदाजी करत असतो आणि त्यावेळी आदिल रशीद (Adil Rashid) त्याला त्रिफळाचीत करतो. यावेळी नेहमीप्रमाणे विराट बाद झाल्यानंतर खूपच नाराज दिसत होता. ईसीबीने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले होते की, “तो सर्वोत्कृष्ट चेंडू, ज्याचा तू आपल्या कारकीर्दीत सामना केला आहेस विराट कोहली?”

भारतीय चाहत्यांना हे आवडले नाही आणि त्यांनी या ट्वीटला प्रत्युत्तर देत लिहिले की, एका वाईट शॉटमुळे विराटपासून त्याचा किंग असण्याचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तसेच दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, विराटला चेंडू समजला नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की, तो चेंडू अप्रतिम होता.

तसेच इतर चाहत्यांनी लिहिले की, इंग्लंड क्रिकेटने व्हिडिओ शेअर करत स्वत:च स्पष्ट केले की, त्यांच्यासाठी विराटची विकेट घेणे किती महत्त्वाचे आहे.

यानंतर ईसीबीने केएल राहुलवर (KL Rahul) निशाना साधण्याचा प्रयत्न केला. विराटप्रमाणेच त्याच दौऱ्याचा आणखी एक व्हिडिओ त्यांनी ट्वीट केला आहे. ज्यामध्ये राहुल रशीदच्या गोलंदाजीवर बाद झाला होता.

या व्हिडिओमध्ये रशीद राहुलला बाद करताना दिसत आहे. ज्यावेळी राहुल १४९ धावांवर खेळत होता. हा व्हिडिओ शेअर करत ईसीबीने लिहिले की, “इंग्लंडच्या जर्सीमध्ये रशीदचा आवडती विकेट.”

 

 ट्रेंडिंग घडामोडी-

-पाकिस्तानी खेळाडू म्हणतो, कटरिना माझ्या गळ्यात पडली आणि…

-त्या एका सवयीमुळे रोहितने भारताच्या मोठ्या खेळाडूला म्हटले मुर्ख

-माजी क्रिकेटपटू म्हणतोय, सौरव गांगुलीच आजपर्यंतचा सर्वोत्तम भारतीय कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---