ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात वनडे विश्वचषकाचे आयोजन केले जाणार आहे. भारतातील दहा शहरांमध्ये हा विश्वचषक खेळला जाईल. यामध्ये कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानाचा देखील समावेश आहे. विश्वचषकातील महत्त्वपूर्ण असे सामने या मैदानावर खेळले जातील. विश्वचषकासाठी अद्याप तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असला तरी, या मैदानावरील खेळपट्टी तयार करणाऱ्या क्युरेटर यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
भारतातील सर्वात जुन्या क्रिकेट मैदानांपैकी एक असलेल्या या मैदानावर 2011 वनडे विश्वचषकातील एकही सामना खेळला गेला नव्हता. यावेळी मात्र या मैदानावर पाच सामने खेळले जातील. यामध्ये यजमान भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध याच मैदानावर खेळेल. तर, उपांत्य फेरीची लढत देखील या मैदानावर होणार आहे. या विश्वचषकात कशा प्रकारच्या खेळपट्ट्या मिळतील याबाबत नुकताच या मैदानाचे पिच क्युरेटर सुजन मुखर्जी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले,
“विश्वचषकासाठी नवीन खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. या नव्या खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांना गोलंदाजी करताना आनंद भेटेल. वेगवान गोलंदाज येथे अधिक प्रभावी ठरू शकतात.”
या मैदानावर विश्वचषकातील पहिला सामना श्रीलंका विरुद्ध बांगलादेश असा 28 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. त्यानंतर 31 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान आणि बांगलादेश हे याच मैदानावर खेळताना दिसतील. त्यानंतर पाच नोव्हेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचा सामना होईल. त्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी इंग्लंड आणि पाकिस्तान हे संघ कोलकातामध्ये खेळणार आहेत. तसेच 16 नोव्हेंबर रोजी उपांत्य फेरीची दुसरी लढत याच मैदानावर असणार आहे.
ईडन गार्डन येथील पारंपारिक खेळपट्टी ही फलंदाजांना पोषक मानली जाते. या मैदानावर मोठ्या धावसंख्या पहायला मिळतात. तसेच फिरकी गोलंदाजांना देखील या ठिकाणी चांगली मदत मिळते.
(Eden Gardens Curetor Confirm This Time World Cup Pitches Useful For Pace Bowlers)
महत्वाच्या बातम्या-
लीड्समधील न्हाव्याचा कांगारू खेळाडूवर मोठा आरोप! म्हणाला, ‘त्याने पैसे देण्याचे वचन दिले पण…’
फास्ट बॉलर्ससाठी गुड न्यूज! बीसीसीआयच्या निर्णयामुळे महत्वाच्या स्पर्धेत मिळणार फायदा