---Advertisement---

माजी कर्णधार बनणार पाकिस्‍तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष? पंतप्रधान घेणार अंतिम निर्णय

On: शुक्रवार, ऑगस्ट 27, 2021 4:37 PM
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष एहसान मणी यांनी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर गुरुवारी (२६ ऑगस्ट) राजीनामा दिला. पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने याची पुष्टी केली. त्यांच्या जागी आता एका माजी पाकिस्तानी कर्णधाराची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते.

पीसीबी पदाधिकाऱ्याने केली पुष्टी
एहसान मणी यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याची पुष्टी एका पीसीबी अधिकार्याने केली. ते म्हणाले, “मणी यापुढे मंडळाचे अध्यक्ष नसतील कारण त्यांचा कार्यकाळ २५ ऑगस्ट रोजी संपत आहे. आम्ही या प्रकरणावर अधिक भाष्य करू शकत नाही. कारण, नवीन अध्यक्षांच्या निवडीची अधिसूचना पंतप्रधान कार्यालयाकडून जारी केली जाईल.”

हा माजी कर्णधार होऊ शकतो अध्यक्ष
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या मंडळाचे संरक्षक आहेत आणि आता ते पीसीबी बोर्ड ऑफ गव्हर्नर्स (बीओजी) मध्ये दोन जणांची नियुक्ती करतील. त्यापैकी एक नवीन अध्यक्ष म्हणून निवडला जाईल. पाकिस्तानचे माजी कसोटी कर्णधार रमीझ राजा बोर्डाचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील, अशा बातम्या येत आहेत. मणी आणि रमीझ या दोघांनी या आठवड्यात पंतप्रधानांसोबत बैठका घेतल्या होत्या. परंतु, पंतप्रधान रमीज यांना बीओजीसाठी नामांकित करतील की, नाही हे स्पष्ट नाही.

रमीझ यांनी दिली ही प्रतिक्रिया
रमीझ यांनी एका क्रिकेट संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “जेव्हा मला बैठकीसाठी बोलावण्यात आले, तेव्हा त्यांनी पाकिस्तान क्रिकेटच्या पुनर्रचनेसाठी पंतप्रधानांना ब्ल्यू प्रिंट दिली होती. पाकिस्तान क्रिकेटला एका नवीन दिशेची गरज आहे. कारण, तिन्ही प्रकारामधील आपली क्रमवारी हे दर्शवते की, आपले क्रिकेट ज्याप्रकारे पंतप्रधानांना हवे होते तसे प्रगती करत नाही.”

दुसरीकडे, मणी यांनी जिओ न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आपण यापुढे मंडळाचे अध्यक्ष म्हणून राहण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

केविन पीटरसनने मोईन अलीले नाव घेत तिसऱ्या कसोटीबद्दल केली भविष्यावाणी; म्हणाला…

एकेवेळी टीम इंडियाला रडवणारा ‘हा’ महान खेळाडू नंतर करत होता बस धुवण्याचे काम

पंचांनी हटवली रिषभच्या ग्लोव्हजवरील पट्टी, वाचा काय आहे नियम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---