---Advertisement---

अयोध्या वादाच्या निकालामुळे इंदोर कसोटीवर होणार हा परिणाम

On: शुक्रवार, नोव्हेंबर 1, 2019 5:01 PM
---Advertisement---

भारत आणि बांगलादेश यांच्यात इंदोर येथे 14 नोव्हेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसाेटी सामन्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

येत्या महिन्यात अयोध्या प्रकरणावर सर्वाच्च न्यायालय आपला निर्णय देण्याची शक्यता असल्यामुळे पोलीस विभाग पहिल्या कसोटी सामना खेळण्यासाठी पुरेसे सुरक्षा उपाय करण्यासाठी तयार आहे.

गुरूवारी पत्रकारांशी बोलताना इंदोर विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजीपी) वरुण कपूर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विचाराने सामन्याच्या ठिकाणी अधिक सैनिक तैनात करण्याचा ऩिर्णय घेण्यात आला आहे.

कपूर म्हणाले की ‘सामना संवेनदशील वेळेत आयाेजित केला जात आहे. यावेळी अयोध्या वादावर सर्वाच्च न्यायालय निकाल देण्याची दाट शक्यता आहे. असे असूनही आम्ही सामन्यासाठी पुरेसे पोलीस बल तैनात करू.’

‘आम्ही इंदोर विभागाच्या आठ जिल्ह्यांमध्ये फोर्स तैनात करण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहोत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला आवश्यकतेनुसार तैनात करण्यासाठी पोलीस मुख्यालयातून पुरेसे पोलीस बळ मिळेल.’

कपूर यांनी पुढे खुलासा केला की पोलीस कर्मचारी सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरही लक्ष ठेवून आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून जातीय सलोख्याला कलंकित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल.

भारतीय संघ इंदोरला कसोटी सामना खेळण्याआधी बांगलादेशविरुद्ध तीन टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर पहिला कसोटी सामना इंदोरमधील होळकर क्रिकेट स्टेडीयमवर होणार आहे.या कसोटी सामन्यानंतर कोलकाता येथे होणारा दुसरा कसोटी सामना दिवस-रात्र कसोटी सामना असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---