भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohmmed Shami) आणि त्याचा लहान भाऊ मोहम्मद कैफ (Mohmmed kaif) सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) या दोन्ही भावांना सुनावणीसाठी नोटीस (समन) बजावली आहे.
शमी आणि कैफ यांच्या जनगणनेच्या अर्जांमध्ये काही तांत्रिक चुका किंवा विसंगती निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आल्या आहेत. यासंदर्भात ‘स्पेशल इंटेंसिव रिव्हिजन’ (SIR) अंतर्गत त्यांची सुनावणी होणार आहे. शमी मूळचा उत्तर प्रदेशचा असला, तरी तो बराच काळ कोलकाता येथे राहतोय. तो कोलकाता महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 93 आणि रासबिहारी विधानसभा मतदारसंघातील मतदार आहे.
निवडणूक आयोगाने त्यांना 5 जानेवारी रोजी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, सध्या विजय हजारे ट्रॉफी सुरू असल्यामुळे शमीने निवडणूक आयोगाला पत्र लिहून आपली अडचण कळवली.
शमीच्या विनंतीनंतर, आता ही सुनावणी 9 ते 11 जानेवारी दरम्यान होणार आहे. तोपर्यंत बंगालचे साखळी सामने संपलेले असतील.
शमी सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालसाठी खेळत आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने 5 सामन्यांत 11 विकेट्स घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही त्याने चांगली गोलंदाजी केली होती, तरीही त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळालेले नाही.






