क्रिकेटमध्ये आजपर्यंत अनेक दिग्गज फलंदाज होऊन गेले आहेत. ज्यांच्या त्यांच्या सर्वांगसुंदर फलंदाजीने अनेक चाहत्यांना वेड लावले. काहींनी आपल्या शुद्ध तांत्रिक फलंदाजीने, कोणी आपल्या संयमी फलंदाजीने कोणी चौफेर फटकेबाजीसाठी प्रसिद्ध झाले. पण आजपर्यंत कोणी एखाद्या प्राण्याला फलंदाजी करताना पाहिले आहे का? प्राणी आणि फलंदाजी हे ऐकूनच अनेकांना आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे, एक हत्ती चक्क फलंदाजी करताना दिसला आहे, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.
अनेक मोठ्या क्रिकेटपटूंनीही फलंदाजी करणाऱ्या हत्तीचा हा व्हिडिओ आपापल्या सोशल मीडिया हँडल्सवर शेअर केला आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून त्यांनी म्हटले आहे की ‘नक्कीच या हत्तीकडे इंग्लिश पासपोर्ट असेल!!’
Surely the Elephant has an English passport !! https://t.co/scXx7CIZPr
— Michael Vaughan (@MichaelVaughan) May 8, 2021
वॉनच्या या ट्विटमुळे मात्र, चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने गमतीने म्हटले आहे की ‘तो (हत्ती) खेळपट्टीवरील सर्व गवत खाऊन टाकेल.’ तर दुसऱ्या चाहत्याने प्रतिक्रिया दिली की ‘खेळपट्टी खूप कोरडी आहे, इंग्लडचे खेळाडू त्यावर खेळू शकत नाही. याव्यतिरिक्तही अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.
He will eat all the grass on pitch sir
— y (@dogdayaftrnoon_) May 8, 2021
Pitch is dusty.. England players can't play on it
— Virarsh (@Cheeku218) May 8, 2021
You could actually blame the pitch here.
— Srikanth Shetty (@SrikanthShettyK) May 8, 2021
Yeh surely ……he has the English passport n will come to England to teach English players how to bat on difficult pitches.
— Karan (@quote_islife_) May 9, 2021
An elephant never forgets the art of batsmanship. Class display.
— nick hardwick (@nickhardwick6) May 8, 2021
😂😂So still England need players from Other countries😕😕😕🙄
— Varma_14 (@Varma45234376) May 9, 2021
वॉनशिवाय विरेंद्र सेहवागने देखील हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले की ‘इनसाईड आऊट ओव्हर कव्हर्स. सोंड आणि डोळ्यांतील समन्वय चांगला आहे.’ सेहवागने शेअर केलेल्या व्हिडिओला १ मिलियनपेक्षाही अधिक लोकांनी पाहिले आहे.
https://www.instagram.com/p/COo5ibRBvh8/
या व्हिडिओमध्ये हत्ती काही लोकांबरोबर क्रिकेट खेळताना दिसत आहे. यादरम्यान तो एक शानदार शॉट खेळतानाही दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘…तर बुमराह सहज ४०० कसोटी विकेट्स घेऊ शकतो’, महान वेगवान गोलंदाजाचे भाष्य