क्रिकेटविश्वात सध्या पुरूष टी20 विश्वचषकाचे (T20 World Cup) वारे वाहू लागले आहे. ही स्पर्धा 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये खेळली जाणार आहे. यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये जय्यत तयारी सुरू आहे. ही स्पर्धा काही दिवसांवरच असल्याने ऑस्ट्रेलियामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा पुरूष संघच नाहीतर महिला संघाच्या काही खेळाडूंनीही भाग घेतला आहे. अशाच एका स्पर्धेत ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू एलिसा पेरी हिने एक विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू एलिसा पेरी ( Ellyse Perry) हिने सर्वात प्रदीर्घ रन अपने गोलंदाजी करण्याचा जुना विक्रम मोडला आहे. फक्त अर्ध्या तासात 6 किलोमीटर पळत एलिसाने डेविड वॉर्नर (David Warner) याला गोलंदाजी केली. यावरूनच 31 वर्षीय एलिसाच्या फिटनेसचा अंदाज लावता येऊ शकतो, कारण एवढे अंतर पार करणे ते पण न थांबता ही खूप मोठी बाब आहे.
पेरीने हा विक्रम क्रिकेटच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या समर सीजनमध्ये केला. तिने सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये कायो स्पोर्ट्सच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या लॉन्च इवेंटमध्ये सर्वात प्रदीर्घ रन अपने गोलंदाजी करण्याचा विश्वविक्रम केला आहे. तिने 6 किमी अंतर 34 मिनिटे 22 सेंकदामध्ये पूर्ण करत नवीन विक्रम रचला. यावेळी ती ऑस्ट्रेलिया पुरूष क्रिकेट संघाचा सलामीवीर डेविड वॉर्नर याला गोलंदाजी करत होती. यावेळी वॉर्नर हा बाद होण्यापासून वाचला. त्याने मेंबर्स पवेलियनच्या बाजूने चांगला हूक शॉट खेळला. त्याच्यासोबत ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) होता, तर विकेटकीपर एलिसा हेली होती.
पेरीने ऑस्ट्रेलियाकडून 10 कसोटीमध्ये 752 धावा करत 37 विकेट्स घेतल्या, तर 128 वनडेमध्ये 3369 धावा केल्या असून 161 विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच तिने 126 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 1253 धावा करत 115 विकेट्स घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आठव्या टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, नेदरलॅण्ड्स, नामिबिया आणि बांगलादेश या देशांनी आपापले संघ जाहीर केले आहे. या स्पर्धेच्या सुपर12 ग्रुप मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश या देशांचा समावेश आहे, तर बाकी चार संघ ग्रुप ए आणि ग्रुप बी यांच्यामधून निश्चित केले जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकात येणार नाही मजा! सात-सात वर्ल्डकप खेळलेले वेस्ट इंडिजचे दिग्गजच बाहेर
स्वागत नहीं करोगे! भारतासाठी ऑस्ट्रेलिया टीमने भरली उड्डाण, विमानातील फोटो केलाय शेअर
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाच्या 5 वेळच्या विश्वविजेत्या क्रिकेटरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती