मंगळवारी (17 डिसेंबर) रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज या वर्षाचे वार्षिक पुरस्कार जाहिर केले आहेत. ऑस्ट्रेलियन (Australian) महिला अष्टपैलू क्रिकेटपटू एलिसा पेरीने (Ellyse Perry) आयसीसीचा या वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा ‘रॅचेल हेहो-फ्लिंट’ (Rachael Heyhoe- Flint Award) पुरस्कार जिंकला केले.
त्याचबरोबर, तिला या वर्षातील आयसीसी सर्वोत्तम महिला वनडे खेळाडू (ICC ODI Player of The Year) म्हणूनही गौरविण्यात आले आहे. एलिसा पेरीने महिलांच्या ऍशेस मालिकेत 3 शतके केली. त्याचबरोबर, सर्व क्रिकेट प्रकारात यावर्षी तिने चांगली कामगिरी केली.
यावर्षी 12 वनडे सामन्यांमध्ये तिने 73.50 च्या सरासरीने 21 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये तिचा 22 धावांत 7 विकेट्स घेण्याचा राष्ट्रीय विक्रमाचा समावेश आहे.
टी20 क्रिकेटमध्ये 1000 धावा आणि 100 विकेट्स पूर्ण करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
“हा एक शानदार सन्मान आहे आणि वर्षभरात किती आश्चर्यकारक कामगिरी केली गेली त्याबद्दल मला धक्काच बसला आहे,” असे तीन वर्षांनंतर दुसऱ्यांदा रॅचेल हेहो-फ्लिंट पुरस्कार जिंकणारी पेरी म्हणाली. यापूर्वी हा पुरस्कार पेरीने 2017मध्ये या पुरस्काराला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा स्विकारला होता.
“असा सन्मान होणे शानदार आहे आणि त्याबद्दल मी मनापासून कौतुक करते. वैयक्तिक पातळीवर वर्षाचा शेवट यामुळे आणखी छान होत आहे,” असेही पेरी म्हणाली.
पेरी व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचीच महिला क्रिकेटपटू एलिसा हेलीला या वर्षातील आयसीसीचा सर्वोत्तम महिला टी20 क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला आहे. तर या वर्षातील सर्वोत्तम उदयोन्मुख महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार थांयलंजची क्रिकेटपटू चनिदा सुथीरूआंगला देण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, हा वेगवान गोलंदाज झाला जखमी
वाचा- ????https://t.co/iEMzo1OOVW????#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi
@MarathiRT #INDvsAUS— Maha Sports (@Maha_Sports) December 17, 2019
आयपीएलमध्ये पहा कोणत्या संघाकडे किता जागा रिक्त
वाचा- ????https://t.co/NuYcRSwCWu????#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi
@MarathiRT #IPLAuction2020— Maha Sports (@Maha_Sports) December 17, 2019





